Pune Mumbai Expressway: पुणे - मुंबई एक्सप्रेस वेवर देवले ब्रिजजवळ भीषण अपघात; एकाचा मृत्यू तर दोन गंभीर जखमी
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 18, 2022 09:53 IST2022-04-18T09:53:24+5:302022-04-18T09:53:43+5:30
पुणे मुंबई एक्सप्रेस वेवर आज पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास देवले पुलाजवळ कोंबड्यांची वाहतूक करणारा पिकअप टेम्पो व ट्रक यांच्या भीषण अपघात झाला

Pune Mumbai Expressway: पुणे - मुंबई एक्सप्रेस वेवर देवले ब्रिजजवळ भीषण अपघात; एकाचा मृत्यू तर दोन गंभीर जखमी
लोणावळा : पुणे मुंबई एक्सप्रेस वेवर आज पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास देवले पुलाजवळ कोंबड्यांची वाहतूक करणारा पिकअप टेम्पो व ट्रक यांच्या भीषण अपघात झाला. यामध्ये पिकअप टेम्पो मधील एकाचा जागीच मृत्यू झाला असून दोन जण गंभीर जखमी झाले आहे.
पुण्याहून मुंबईच्या दिशेने जाताना हा अपघात झाला. दोन्ही जखमींवर एक्सप्रेसवेच्या ट्रामा केअर सेंटरमध्ये प्राथमिक उपचार करून सोमाटणे येथील पवना रुग्णालयात पुढील उपचारासाठी पाठविण्यात आले असल्याची माहिती रुग्णवाहिका सेवा देणारे अजय मोरे यांनी दिली. प्रथमदर्शनी पिकअप टेम्पो ट्रकला मागून धडकून हा अपघात झाल्याचे दिसत आहे. पिकअप टेम्पोच्या दर्शनी भागाचा चक्काचूर झाला आहे. मागील काही दिवसांपासून एक्सप्रेस वेवरील अपघातांची संख्या पुन्हा वाढली आहे. मागील आठवड्यात गंहुजे गावाजवळ उभ्या ट्रकला कार धडकून पुण्यातील चार जणांचा मृत्यू झाला होता. घाट परिक्षेत्रात अपघातांची दैनंदिन मालिका सुरुच आहे.