VIDEO : ...अन् राज ठाकरेंनी दोन मिनिटांत साकारलं अटलबिहारींचं रेखाचित्र
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 23, 2018 14:52 IST2018-08-23T14:45:53+5:302018-08-23T14:52:17+5:30
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या कुंचल्यातील जादू आज पुण्यातील तरुणांनी प्रत्यक्ष अनुभवली.

VIDEO : ...अन् राज ठाकरेंनी दोन मिनिटांत साकारलं अटलबिहारींचं रेखाचित्र
पुणे - मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या कुंचल्यातील जादू आज पुण्यातील तरुणांनी प्रत्यक्ष अनुभवली. 'पुणे आर्ट, पुणे हार्ट' आयोजित कला उत्सव प्रदर्शनाचं उद्घाटन करण्यासाठी राज ठाकरे उपस्थित होते. तेव्हा, त्यांनी एखादं व्यंगचित्र काढून दाखवावं, असा हट्टच तिथल्या तरुणाईनं धरला. राज यांनी त्यांना नाराज केलं नाही. आधी पेन्सिलनं आउटलाइन काढून घेत, त्यांनी काही मिनिटांत माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांचं एक रेखाचित्र साकारलं, तेव्हा या कलाविष्काराला उपस्थितांनी टाळ्यांच्या गजरात दाद दिली.