शहरं
Join us  
Trending Stories
1
...तर परत मी लोकसभा निवडणूक लढवणार नाही; भोरमध्ये अजित पवारांची घोषणा
2
सोढीचं शेवटचं लोकेशन, ATM मधून काढले 7 हजार; गुरुचरण सिंग अचानक बेपत्ता, गूढ कायम
3
देवेंद्र फडणवीस पवारांना काटशह देणार?; अभिजीत पाटलांच्या भाजप प्रवेशाची चर्चा
4
धमक्या कशाला देता? ४ जूनला जनताच तुम्हाला बघून घेईल - संजय राऊत
5
Sunita Kejriwal : "प्रत्येकजण हुकूमशाही हटवण्यासाठी आणि लोकशाही..."; सुनीता केजरीवाल यांचा रोड शो
6
दादा-भाईंचं मनोमीलन, बदलणार का सिंधुदुर्गातलं समीकरण?, असं आहे गणित... 
7
Sangli: प्रकाश शेंडगेंच्या मोटारीला चपलांचा हार, काळे फासले, धमकीचे पत्रही लावले
8
याला म्हणतात नशीब! बॉयफ्रेंडच्या 'त्या' एका सल्ल्याने 'ती' झाली लखपती; मिळाले 41 लाख
9
"रावणानं सीतेचं हरण केलं आणि नरेंद्र मोदी यांनी…” काँग्रेसच्या महिला नेत्याची बोचरी टीका
10
शेव्हिंग कंपनीने टॉपर प्राचीच्या समर्थनार्थ दिली पानभर जाहिरात; शेवटचा सल्ला वाचून नेटकऱ्यांचा संताप अनावर
11
वर्षा गायकवाडांविरोधात कसं लढणार? उज्ज्वल निकम म्हणाले, ‘कोर्टात समोरच्याला…’
12
भाजपा आमदाराच्या गाडीवर अज्ञातांकडून हल्ला, दगडफेकीत समोरील काच फुटली
13
Sahil Khan : अभिनेता साहिल खानच्या अडचणीत वाढ; महादेव बेटिंग App प्रकरणी मुंबई पोलिसांची मोठी कारवाई
14
J P Nadda : "ही ममता बॅनर्जींची सर्वात मोठी चूक, तुम्ही बंगालचं काय केलं?"; जेपी नड्डा यांचा हल्लाबोल
15
नरेंद्र मोदी आज कर्नाटकात करणार वादळी प्रचार, दिवसभरात 4 सभांचे आयोजन
16
‘अमित शाह, योगी आदित्यनाथ यांनी कोकणात यायच्या भानगडीत पडू नये, इथे आल्यास…’, भास्कर जाधव यांचा इशारा
17
"ते म्हणतात की, मी अपवित्र आहे, कारण...", कंगनाचा विक्रमादित्य यांच्यावर जोरदार हल्लाबोल
18
प्रचाराच्या रणधुमाळीदरम्यान मुंबईतील भांडुपमधून तीन कोटींची रोकड जप्त, तपास सुरू
19
आजचे राशीभविष्य - २८ एप्रिल २०२४, सार्वजनिक जीवनात मान-प्रतिष्ठा वाढेल
20
आमिरला पहिल्या पत्नीने लगावली होती कानशिलात, नेमकं काय घडलं होतं? अभिनेत्याने केला खुलासा

Pune Metro: अखेर संभाजी पुलावर मेट्रोचे गर्डर उभे; मध्यरात्रीनंतर सात तासात काम केले पूर्ण

By ऑनलाइन लोकमत | Published: December 24, 2021 9:10 PM

गणेश मंडळांचा विरोध, महापालिकेतील सभागृहात झालेले आरोप-प्रत्यारोप व मानाच्या गणपतींनी बुधवारी दिलेला पाठिंबा अशा सर्व घडामोडींमध्ये, अखेर गुरूवारी मध्यरात्रीनंतर संभाजी पुलावर (लकडी पुल) पोलिस बंदोबस्तात मेट्रोचे गर्डर टाकण्यात आले

पुणे : गणेश मंडळांचा विरोध, महापालिकेतील सभागृहात झालेले आरोप-प्रत्यारोप व मानाच्या गणपतींनी बुधवारी दिलेला पाठिंबा अशा सर्व घडामोडींमध्ये, अखेर गुरूवारी मध्यरात्रीनंतर संभाजी पुलावर (लकडी पुल) पोलिस बंदोबस्तात मेट्रोचे गर्डर टाकण्यात आले. रात्री पावणे एक वाजता क्रेनच्या सहाय्याने गर्डर उभे करण्याचे काम सुरू झाले ते शुक्रवारी सकाळी सातपर्यंत पूर्ण करण्यात आले.  वनाज ते रामवाडी मेट्रो मार्गावरील वनाज पासून गरवारे महाविद्यालयापर्यंतचे बहुतांशी काम पूर्ण झाले आहे. मात्र संभाजी पुलावरील काम गेल्या चार महिन्यांपासून विरोधामुळे बंद होते. गणेश विसर्जन मिरवणुकीला या मेट्रो पुलाचा अडसर ठरणार असल्याचे सांगत गणेश मंडळांनी या कामाला आक्षेप घेतला होता़ मेट्रो व्यवस्थापनाने अन्य पर्याय व्यवहार्य नसल्याचा अहवाल दिल्यावर महापौर मुरलीधर मोहोळ यांनी काम सुरू करण्याचे आदेश दिले होते.  मात्र तरीही मेट्रोच्या कामाला संभाजी पुलावर विरोध चालूच होता. 

महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत विरोधी पक्षाने केला होता विरोध   सोमवारी (दि़२१) झालेल्या महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत विरोधी पक्षाने संभाजी पुलावरील मेट्रो पुलाच्या उंचीवरून तीव्र विरोध केला होता. यावेळी झालेल्या आरोप प्रत्यारोपात सत्ताधारी भाजपने राज्याचे उमुख्यमंत्री अजित पवार यांनीच पोलिस बंदोबस्तात काम सुरू करण्याचे आदेश दिले असल्याचे महामेट्रोचे पत्रच माध्यमांना दिले. यामुळे २२ डिसेंबरच्या रात्री हे काम सुरू होईल अशी शक्यता होती. मात्र हे काम २३ डिसेंबर रोजी म्हणजे गुरूवारी रात्री पावणे एक वाजता सुरू झाले. दरम्यानच्या काळात संंभाजी पुलावर दोन्ही बाजूने येणारी वाहतुक पूर्णत: बंद 

संभाजी पुलाच्या दोन्ही बाजूला मोठ्या पोलिस बंदोबस्तात पुलावर रात्री पावणे एक वाजता गर्डर टाकण्याचे काम सुरू झाले. साधारणत: सात तास चाललेल्या या कामामध्ये मेट्रो मार्गिकेच्या एका बाजूचे गर्डन फिट करण्यात आले असून, दुसऱ्या बाजूचे गर्डन पुढील आठवड्यात बसविण्यात येणार आहेत. दरम्यानच्या काळात संंभाजी पुलावर दोन्ही बाजूने येणारी वाहतुक पूर्णत: बंद करण्यात आली होती. शुक्रवारी सकाळी सात वाजता हे काम संपले असले तरी, साधारणत: साडेअकरापर्यंत या पुलावरून सर्व वाहतुक बंदच होती. या काळात पुलावर गर्डर उभारणीसाठी उभारण्यात आलेली यंत्रणा, मोठे क्रेन हटविण्यात आले़ यावेळी वाहतुक बंद असल्याने येथील वाहतुकीचा ताण मात्र शहरातील पेठांमधील रस्त्यांवर, नदीपात्रातील रस्त्यावर तसेच झेड पुलावर मोठ्या प्रमाणात आला होता. 

टॅग्स :Metroमेट्रोGanesh Mahotsavगणेशोत्सवPune Municipal Corporationपुणे महानगरपालिकाAjit Pawarअजित पवारMayorमहापौर