शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

पुणे मेट्रोचं आता मोदींच्या हस्ते ऑनलाइन उद्घाटन होणार?; शिंदे-फडणवीस-अजितदादांमध्ये खलबतं

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 26, 2024 15:04 IST

मेट्रो मार्गाचे ऑनलाइन उद्घाटन करण्यासाठी सरकारी पातळीवर प्रयत्न होत असल्याची माहिती समोर आली आहे.

Pune Metro ( Marathi News ) : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज पुणेमेट्रोच्या स्वारगेट ते मंडई या भुयारी मार्गाचे लोकार्पण होणार होते. मात्र शहरात मागील काही दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदी यांचा आजचा दौरा रद्द करण्यात आला. त्यामुळे या मेट्रो मार्गाचे उद्घाटन लांबणीवर पडणार का, अशी चर्चा सुरू असतानाच आता ऑनलाइन उद्घाटनासाठी सरकारी पातळीवर प्रयत्न होत असल्याची माहिती समोर आली आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार हे गणेश क्रीडा कला रंगमंचमध्ये प्रत्यक्ष उपस्थित राहून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ऑनलाइन उद्घाटन करण्यासाठी चर्चा सुरू असल्याचे समजते. कारण स्वारगेट ते मंडई या मार्गावरील मेट्रो मागील काही दिवसांपासून तयार असून केवळ उद्घाटन कार्यक्रमामुळे लोकार्पण रखडले आहे. त्यामुळे या प्रकल्पाचे ऑनलाइन पद्धतीने उद्घाटन करून लोकांसाठी ही सेवा उपलब्ध केली जाऊ शकते.

दरम्यान, गणेशोत्सव काळातच पुण्यातील या मेट्रो मार्गाचे उद्घाटन होईल, अशी शक्यता वर्तवली जात होती. मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून या कार्यक्रमासाठी २६ सप्टेंबर ही वेळ देण्यात आली होती. परंतु आता पावसामुळे मोदींचा पुणे दौरा रद्द झाला आहे.

मेट्रो प्रशासनाने नागरिकांना काय आवाहन केलं? उद्घाटन समारंभ रद्द झाल्याने जिल्हा न्यायालय मेट्रो स्थानक ते स्वारगेट मेट्रो स्थानक ही सेवा कार्यान्वित नसल्याचे मेट्रो प्रशासनाने सांगितले आहे. मेट्रो प्रवासी सेवेत आज जे इतर बदल करण्यात आले होते ते रद्द करण्यात आले असून इतर मार्गावरील मेट्रो सेवा नियमितपणे सुरु राहील, अशी माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे. 

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीPuneपुणेMetroमेट्रो