Pune Metro: एसएनडीटी मेट्रो स्टेशनपासून बस बे सुरू; PMPML च्या बसेस थांबण्यास सुरूवात
By निलेश राऊत | Updated: July 1, 2023 18:15 IST2023-07-01T18:12:43+5:302023-07-01T18:15:26+5:30
या ठिकाणाहून शुक्रवारी दुपारपासून पीएमपीएमएलच्या कर्वे रस्ता व पौड रस्त्यामार्गे जाणाऱ्या पीएमपीएमएलच्या सर्व बसेस थांबण्यास सुरूवात झाली आहे...

Pune Metro: एसएनडीटी मेट्रो स्टेशनपासून बस बे सुरू; PMPML च्या बसेस थांबण्यास सुरूवात
पुणे : महामेट्रोच्यावतीने वनाज ते गरवारे कॉलेजपर्यंत मेट्रो मार्गावरील एस.एन.डी.टी. कॉलेज येथील मेट्रो स्टेशन येथील बस बे नुकताच कार्यरत झाला आहे. त्यामुळे या ठिकाणावरील बस बे वर पीएमपीएमएलच्या बसेस थांबण्यास सुरूवात झाली आहे.
महामेट्रोच्यावतीने नळस्टॉप येथील मेट्रो स्टेशन येथे मेट्रो प्रवाशांसाठी स्टेशन बाहेर पडल्यावर लागलीच पीएमपीएमएलची बस सेवा मिळावी, यासाठी स्टेशनबाहेरच शेड टाकून बस बे ची उभारणी करण्यात आली आहे.
या ठिकाणाहून शुक्रवारी दुपारपासून पीएमपीएमएलच्या कर्वे रस्ता व पौड रस्त्यामार्गे जाणाऱ्या पीएमपीएमएलच्या सर्व बसेस थांबण्यास सुरूवात झाली आहे. नळस्टॉप येथील मेट्रो स्थानकावरील बस बे वर कोथरूडकडे जातानाच्याच सर्व बस थांबणार आहेत. तर कोथरूडवरून डेक्कनच्या दिशेने येणाऱ्या बस करिता एस.एन.डी.टी. कॉलेज येथील पूर्वीचाच पीएमपीएमएलचा बस स्टॉप राहणार आहे. अशी माहिती पीएमपीएमएल प्रशासनाने दिली.