पुणे - महानगरपालिका निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने निर्विवाद वर्चस्व सिद्ध करत महापालिकेवर एकहाती सत्ता मिळवली आहे. एकूण 165 जागांपैकी 119 जागांवर भाजपने विजय मिळवत स्वबळावर सत्ता स्थापन करण्याचा पराक्रम केला आहे. या दैदिप्यमान यशानंतर आता संपूर्ण शहराचे लक्ष पुण्याच्या महापौरपदाकडे लागले आहे. महापौर पदासाठी आज मुंबईत आरक्षण सोडत जाहीर करण्यात आली. या सोडतीनुसार पुणे महानगरपालिकेचे महापौर पद खुल्या महिला प्रवर्गासाठी आरक्षित झाले आहे. त्यामुळे पुण्याचा पुढील महापौर हा महिला असणार, हे स्पष्ट झाले आहे.
यंदाच्या महापालिका निवडणुकीत भाजपने महिलांना मोठ्या प्रमाणावर संधी दिली होती. तब्बल 92 महिला उमेदवार रिंगणात उतरवल्या होत्या. निकालापूर्वीच पालिकेत महिलांचा दबदबा राहणार, याचे संकेत मिळाले होते. निकालानंतर भाजपच्या ५० हून अधिक महिला नगरसेविका निवडून आल्या असून त्यांच्यापैकीच एक महिला महापौरपद भूषवणार आहे.
महापौरपदासाठी सध्या काही नावांची चर्चा सुरू आहे. त्यामध्ये रंजना टिळेकर, मंजुषा नागपुरे, मानसी देशपांडे, वर्षा तापकीर यांचा समावेश आहे. रंजना टिळेकर या विधानपरिषद आमदार योगेश टिळेकर यांच्या मातोश्री असून त्या पाच वेळा निवडून आल्या आहेत. मानसी देशपांडे यांनी विजयाची हॅट्रिक साधली असून त्या राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांच्या नातेवाईक आहेत. मंजुषा नागपुरे यांनी यंदा बिनविरोध विजय मिळवला आहे. तर खडकवासला मतदारसंघातून आलेल्या वर्षा तापकीर यांनीही सलग तिसरा विजय मिळवला आहे.
मात्र भाजपकडून ऐनवेळी ‘सरप्राईज’ देण्याची शक्यता कायम आहे. त्यामुळे चर्चेत असलेल्या नावांखेरीजही एखादे नवे नाव पुढे येऊ शकते. यंदाच्या निवडणुकीत भाजपने ‘यंग ब्रिगेड’वर भर दिला असून त्याचा मोठा राजकीय फायदा पक्षाला झाला आहे. एकीकडे भाजपची सत्ता निश्चित असताना, दुसरीकडे पुण्याचा कारभार नेमकी कोणती महिला सांभाळणार, याबाबतची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.
Web Summary : BJP's sweeping victory sets the stage for a female mayor. The race is on, with Ranjana Tilekar, Manjusha Nagpure, Mansi Deshpande, and Varsha Tapkir as frontrunners. BJP may spring a surprise, keeping everyone guessing.
Web Summary : भाजपा की शानदार जीत के बाद महिला महापौर की चर्चा ज़ोरों पर है। रंजना टिळेकर, मंजुषा नागपुरे, मानसी देशपांडे और वर्षा तापकीर प्रमुख दावेदार हैं। भाजपा चौंका सकती है, इसलिए उत्सुकता बनी हुई है।