शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
3
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
4
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
5
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
6
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
7
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
8
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
9
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
10
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
11
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
12
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
13
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
14
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
15
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
16
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
17
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
18
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
19
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
20
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

'पालकमंत्री एक बोलतात, आरोग्यमंत्री दुसरं आणि मुख्यमंत्री तिसरंच; पुण्यासोबत दुजाभाव का?'

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 3, 2021 14:53 IST

Pune Corona: 'कोरोना नियम शिथिल करण्यावरून राज्य सरकारमध्ये मतभेद'

ठळक मुद्देव्यापाऱ्यांच्या या आंदोलनाला पाठिंबा असल्याचाची महापौर मुरलीधर मोहोळ यांची माहिती.

पुणे: कोरोना संसर्ग नियंत्रणात आल्यामुळे ब्रेक दि चेन अंतर्गत निर्बंधातील काही अटी शिथिल करण्यात आले आहेत. राज्य सरकारनं सोमवारी राज्यातल्या 25 जिल्ह्यांमध्ये कोरोना निर्बंधांना शिथिलता देण्याचा निर्णय घेतला. तर 11 जिल्ह्यांमध्ये लेव्हल 3 चे निर्बंध कायम ठेवण्यात आले आहेत. निर्बंध कायम असलेल्या जिल्ह्यांमध्ये पुण्याचा समावेश आहे. यावरुन आता पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी सरकारवर निशाणा साधलाय.

राज्यातील 25 जिल्ह्यांमध्ये निर्बंध शिथिल करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. नव्या नियमानुसार 25 जिल्ह्यात सोमवार ते शुक्रवारी 8 वाजेपर्यंत सर्व दुकानं सुरु ठेवता येतील. तर शनिवारी दुपारी 3 पर्यंत दुकानं सुरु ठेवण्यास मुभा असेल. मात्र रविवारी पूर्णत: बंद असेल. निर्बंध शिथिल झालेल्या जिल्ह्यांमध्ये मुंबईचे नाव आहे पण पुण्याचे नाही. यावरुन मुंबई आणि पुणे या शहरांमध्ये दुजाभाव का? असा सवाल पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी केला आहे. तसेच, पुण्याबाबत पालकमंत्री एक बोलतात, आरोग्यमंत्री दुसरं आणि मुख्यमंत्री तिसरंच बोलतात, अशी टीकाही त्यांनी केली.

पुण्यासोबत दुजाभाव ?दरम्यान, कोरोना निर्बंधांवरुन पुण्यातील व्यापारी आक्रमक झाले आहेत. सरकारनं पुण्यातले निर्बंध हटवावेत अशी व्यापाऱ्यांची आग्रही मागणी आहे. मुख्यमंत्र्यांनी निर्बंध हटवण्याची घोषणा केल्यानंतर पुण्यातले निर्बंधही हटवले जातील, अशी या व्यापाऱ्यांना अपेक्षा होती. आता राज्य सरकारच्या विरोधात व्यापाऱ्यांनी आंदोलन पुकारलं आहे. व्यापाऱ्यांच्या या आंदोलनाला पाठिंबा असल्याचं महापौर मुरलीधर मोहोळ यांनी स्पष्ट केलं.

या जिल्ह्यांमध्ये निर्बंध कायमराज्यातील 11 जिल्ह्यांत कोरोना रुग्णांची संख्या मोठी आहे. सक्रीय कोरोना रुग्ण अधिक असलेल्या जिल्ह्यांमध्ये पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, अहमदनगर, सोलापूर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, बीड, पालघर या जिल्ह्यांच्या समावेश आहे. त्यामुळे जिल्ह्यांमध्ये तिसऱ्या लेव्हलचे निर्बंध कायम ठेवण्यात आले आहेत. 

टॅग्स :Puneपुणेcorona virusकोरोना वायरस बातम्याBJPभाजपाShiv SenaशिवसेनाNCPराष्ट्रवादी काँग्रेसcongressकाँग्रेस