पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ अडचणीत, अ‍ॅट्रॉसिटी अंतर्गत न्यायालयाचे गुन्हा दाखल करण्याचे आदेश

By ऑनलाइन लोकमत | Published: December 9, 2021 03:16 PM2021-12-09T15:16:25+5:302021-12-09T15:45:27+5:30

काही दिवसांपूर्वी कोथरूड परिसरातील सार्वजनिक शौचालयाचे बांधकाम तोडण्याचे निर्देश प्रशासनाने दिले होते...

pune mayor murlidhar mohol district court order file charges under atrocity | पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ अडचणीत, अ‍ॅट्रॉसिटी अंतर्गत न्यायालयाचे गुन्हा दाखल करण्याचे आदेश

पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ अडचणीत, अ‍ॅट्रॉसिटी अंतर्गत न्यायालयाचे गुन्हा दाखल करण्याचे आदेश

googlenewsNext

पुणे: महापौर मुरलीधर मोहोळ यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. कारण, जिल्हा न्यायालयाने पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ (murlidhar mohol) यांच्यावर अ‍ॅट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल कऱण्याचे आदेश दिले आहेत. शहरातील सार्वजनिक शौचालय, अतिक्रमणावर केलेल्या कारवाई दरम्यान झालेल्या वादानंतर न्यायालयाने हे आदेश दिले आहेत. या प्रकरणी गुन्हा दाखल करुन एक महिन्यांत अहवाल द्यावा असे आदेश न्यायालयाने दिले आहेत.

काही दिवसांपूर्वी कोथरूड परिसरातील सार्वजनिक शौचालयाचे बांधकाम तोडण्याचे निर्देश प्रशासनाने दिले होते. या कारवाईवरुन मोठा वाद झाला होता. परिसरातील नागरिकांनी जागा सोडून जावे यासाठी महापौर मुरलीधर मोहोळ यांनीच ही कारवाई केल्याचा आरोप फिर्यादीत करण्यात आला आहे. त्यानंतर एका व्यक्तीने न्यायालयात याचिका दाखल केले होती. यावर जिल्हा न्यायालयाने सुनावणी करताना पोलिसांना गुन्हा नोंद करुन तपास करण्याचे आदेश दिले आहेत. याप्रकरणी अद्याप महापौर मुरलीधर मोहोळ यांची प्रतिक्रिया समोर आलेली नाहीये. महापौर मुरलीधर मोहोळ यांना विचारले असता त्यांनी म्हटले, या प्रकरणात आपण सविस्तर माहिती घेऊन आपली बाजू लवकरच मांडणार आहोत.

Web Title: pune mayor murlidhar mohol district court order file charges under atrocity

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.