शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
5
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
6
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
7
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
8
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
9
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
10
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
11
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
12
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
13
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
14
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
15
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
16
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
17
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
18
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
19
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
20
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
Daily Top 2Weekly Top 5

महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसच्या सरचिटणीसांसह अन्य १०० पदाधिकारी देणार राजीनामा

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 16, 2025 15:41 IST

काँग्रेस पक्षातील अन्य १०० पदाधिकारी देखील येत्या २-३ दिवसात राजीनामा देणार

पुणे : राज्यभर सध्या पक्षांतराचे वारे जोरात वाहत आहेत. त्यात पुणे देखील मागे राहिलेले नाही. नुकताच गेल्या काही दिवसांपूर्वी कसबा विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार रवींद्र धंगेकर यांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला. त्यानंतर आता काँग्रेसला देखील गळती लागल्याची चर्चा शहरात आहे. महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे सरचिटणीस रोहन सुरवसे पाटील व एनएसयुआय पुणे सरचिटणीस कृष्णा साठे यांच्यासह पक्षातील अन्य १०० पदाधिकारी देखील येत्या २-३ दिवसात राजीनामा देणार असल्याची माहिती सुत्रांनी दिली.गेल्या काही दिवसांपासून विरोधी पक्षातील पदाधिकारी सत्ताधारी पक्षांमध्ये प्रवेश करताना राज्यभर दिसून येत आहेत. भारतीय जनता पक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट अथवा शिवसेना शिंदे गटात प्रवेश होत आहेत. गेल्या काही दिवसांपूर्वीच सुरवसे पाटील हे काँग्रेस पक्षाला रामराम ठोकणार अशी बातमी समोर आली होती.आता पक्षप्रवेशाची तारीख निश्चित झाली असून, येत्या २ ते ३ दिवसांमध्ये सुरवसे पाटलांसह युवक काँग्रेसचे १०० पदाधिकारी राजीनामा देत दुसऱ्या पक्षात प्रवेश करणार असल्याच्या चर्चेला उधाण आले आहे. विश्वसनीय सुत्रांनुसार येत्या आठवड्यात या पदाधिकाऱ्यांचा राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटात प्रवेश होणार असल्याचे बोलले जात आहे.

टॅग्स :PuneपुणेMaharashtraमहाराष्ट्रpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडPoliceपोलिसcongressकाँग्रेस