शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Municipal Election 2026 Live: मतदान सुरू होताच जळगाव येथे गोंधळ; गणेश नाईकांना केंद्र सापडेना
2
आज साडेतीन कोटी मतदारांचा दिवस,'महा'मतदान करू, 'योग्य' सेवक निवडू; २,८६९ जागांसाठी दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला
3
आजचे राशीभविष्य, १५ जानेवारी २०२६: अचानक धनलाभ, अलौकिक अनुभूती; मान-सन्मानाचा दिवस
4
दिग्गज नेत्यांची प्रतिष्ठा आज 'ईव्हीएम' बंद होणार; मुंबईत ठाकरे बंधू की भाजप-शिंदे याचा फैसला
5
शिंदेसेनेच्या दोन उमेदवारांना रुग्णालयातच अटक केल्यावरून उडाला गोंधळ, भाजपने केली होती मागणी
6
मतदारांनो, घरबसल्याच शोधा मतदार यादीमध्ये नाव! निवडणूक आयोगाचे पोर्टल, मोबाइलवर सुविधा
7
उन्हाचा तडाखा अन् उकाडा... मतदानाला सकाळीच पडा बाहेर, मुंबईकर घामाघूम होण्याची शक्यता
8
मुंबईत मतमोजणीत अडचण आली तरच करणार 'पाडू' यंत्राचा वापर; निवडणूक आयोगाचे स्पष्टीकरण
9
ट्रम्प यांच्या टॅरिफवर आज कोणताही निर्णय नाही, अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयाची सुनावणी दुसऱ्यांदा पुढे ढकलली
10
Daryl Mitchell च्या शतकासह यंगची 'विल पॉवर'! टीम इंडियावर पलटवार करत न्यूझीलंडनं साधला बरोबरीचा डाव
11
इराणवर रात्रीच हल्ला? नेतन्याहू यांच्या विमानाचं हवेत उड्डाण; ५० ठिकाणं अमेरिकेच्या हिटलिस्टवर
12
Daryl Mitchell Hundred : डॅरिल मिचेलची कडक सेंच्युरी; किंग कोहलीच 'नंबर वन' स्थान धोक्यात!
13
अमेरिकेने केली इराणची कोंडी, चारही बाजूंनी घेरले; 'या' देशांमध्ये लष्करी तळ...
14
हजारीबागमध्ये भीषण बॉम्ब ब्लास्ट, तिघांचा मृत्यू, एकजण गंभीर जखमी
15
अमेरिकेच्या टॅरिफ धोरणावर आज रात्री फैसला; ट्रम्प यांच्याविरोधात निकाल गेल्यास काय घडू शकतं?
16
शिंदेंच्या उमेदवाराच्या घरावर मतदानाआधी दगडफेक; खिडक्या फोडल्या, खुर्च्या तोडल्या, प्रचंड राडा
17
मैत्री मैत्रीच्या ठिकाणी...! युद्धात इराणला साथ देणार नाही चीन? कारण काय?
18
धक्कादायक ! नागपुरात बाप झाला सैतान,पत्नीकडे ताबा जाऊ नये म्हणून पोटच्या मुलीची हत्या
19
लहानपणीची गोंडस मुलगी आता झालीये सुपरहॉट, रेड बॅकलेस ड्रेसमध्ये सारा अर्जुनचा किलर लूक!
20
"JJD हा लालूंचा खरा पक्ष"; राजद विलीनीकरणावर तेजप्रताप यांची तेजस्वींना थेट ऑफर
Daily Top 2Weekly Top 5

राजगुरूनगर नगराध्यक्षपदासाठी चौरंगी लढतीत कोण बाजी मारणार?

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 29, 2025 10:24 IST

नगरसेवकपदासाठी भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी आमने-सामने

राजगुरूनगर : राजगुरूनगर नगरपरिषदेच्या निवडणुकीसाठी रणधुमाळी सुरू झाली असून, चुरशीची चौरंगी लढत होणार आहे. नगराध्यक्षपदासाठी भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी आणि शिवसेना (उद्धवसेना) यांच्या गटांमधील खरी लढत रंगणार आहे.

राजगुरूनगर नगरपरिषदेच्या नगराध्यक्षपदासाठी भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी, उद्धवसेना अशा चार पक्षांचे उमेदवार आणि एक अपक्ष उमेदवार रिंगणात आहेत. तीन नगरसेवक बिनविरोध झाल्यामुळे नगरसेवकपदासाठी १८ जागांसाठी ५९ उमेदवार उभे आहेत. त्यामध्ये भाजपचे १२, राष्ट्रवादीचे १४, शिवसेनेचे १५ आणि अपक्ष १४ उमेदवार आहेत. या निवडणुकीत महायुतीत असलेल्या तिन्ही पक्षांनी पूर्ण ताकदीने भाग घेतल्यामुळे एकमेकांना मदत होण्याची शक्यता कमी आहे. भाजपचा दावा आहे की, “राज्यात खऱ्या अर्थाने आमची सत्ता आहे. पाणी आणि सांडपाणी योजना आम्हीच आणली आहेत, त्यामुळे विकासही आम्हीच करू शकतो.” तर राष्ट्रवादी काँग्रेसची भूमिका अशी आहे की, “सत्तेत असल्यामुळे आपण हुतात्मा राजगुरू स्मारक, क्रीडा संकुल, अंतर्गत रस्ते, पूल, न्यायालयाची इमारत आणि पोलिस ठाण्याची इमारत यांसारखी कामे केली आहेत आणि यापुढेही विकासाची कामे आम्हीच करू शकतो. शिवसेनेतील (शिंदेसेना) उमेदवारांचा दावा आहे की, “पाणी आणि सांडपाणी योजनेत अनेक त्रुटी असून त्या पूर्णत्वाकडे गेल्या नाहीत. तसेच शहराच्या अनेक मूलभूत समस्यांच्या निराकरणासाठी व गावाच्या योग्य विकासासाठी आम्ही शिवसेनेत घेतले.”

महाविकास आघाडीतील शिवसेनेचा (उद्धवसेना) एकमेव उमेदवार असून त्यांना काँग्रेस आणि राष्ट्रवादी पक्षांचा फायदा होऊ शकतो. उमेदवारांनी प्रचाराच्या मुद्द्यावरही अनेकांनी तयारी सुरू केली आहे. शहराच्या विकासाचे प्रश्न, रखडलेले मुद्दे, तसेच उमेदवार व पक्षांचे जाहीरनामे व वचननामे प्रचारात प्रमुख ठरण्याची शक्यता आहे. यासह प्रतिस्पर्ध्यांमध्ये आरोप-प्रत्यारोपांचीही फेरी पडणार आहे. सर्व उमेदवारांनी एकमेकांशी गाठीभेटींवर भर दिला आहे. रॅली आणि प्रभागातून प्रचारफेरी काढली जात आहेत. उमेदवारांनी प्रचारपत्रके, चित्रफिती, गल्लोगल्ली फिरणाऱ्या रिक्षा यांसह शहरात रणधुमाळी रंगवली आहे. मतदारांना लक्ष्मी दर्शन होऊ लागले असून थंडीत उबदार स्वेटर, महिलांना साड्या व विविध वस्तू वाटप सुरू असल्याचे दिसत आहे. दरम्यान, राजकीय नेत्यांकडून मतदारांना जागरूक राहून केवळ विकासाच्या मुद्द्यांवर मतदान करण्याचे आवाहन देखील करण्यात येत आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Rajgurunagar Mayoral Race: Four-way battle intensifies for the top spot.

Web Summary : Rajgurunagar sees a fierce four-way mayoral contest between BJP, Shiv Sena, NCP, and Uddhav Sena. Development claims and counterclaims dominate campaigning as candidates woo voters with promises and gifts. Key issues include water projects and infrastructure.
टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडLocal Body Electionस्थानिक स्वराज्य संस्था निवडणूकZilla Parishad Electionजिल्हा परिषद निवडणूकPMC Electionsपुणे महापालिका निवडणूक २०२५PuneपुणेMaharashtraमहाराष्ट्र