Pune Local Body Election Result 2025: पुणे जिल्ह्यात अजितदादांचे वर्चस्व; १० जागांवर राष्ट्रवादीचे नगराध्यक्ष, जाणून घ्या यादी एका क्लिकवर...
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 21, 2025 15:25 IST2025-12-21T15:24:57+5:302025-12-21T15:25:06+5:30
Pune Nagaradhyaksha Winners List: १४ नगरपरिषदा आणि ३ नगरपंचायती मध्ये अजित पवारांच्या राष्ट्रवादीने बाजी मारली असून १० जागांवर वर्चस्व मिळवले आहे. तर एकनाथ शिंदे गटाला ४ आणि भाजपला ३ जागा मिळाल्या आहेत.

Pune Local Body Election Result 2025: पुणे जिल्ह्यात अजितदादांचे वर्चस्व; १० जागांवर राष्ट्रवादीचे नगराध्यक्ष, जाणून घ्या यादी एका क्लिकवर...
Pune Nagaradhyaksha Winners List: जिल्ह्यातील १४ नगरपरिषदा आणि तीन नगरपंचायतींच्या निवडणुकीमध्ये बहुतांश ठिकाणी निवडणूक रिंगणात महायुतीतील घटक पक्ष एकमेकांसमोर उभे राहिले होते. जिल्ह्यात सगळ्या ठिकाणी महायुतीने वर्चस्व मिळवले आहे. १४ नगरपरिषदा आणि ३ नगरपंचायती मध्ये अजित पवारांच्या राष्ट्रवादीने बाजी मारली असून १० जागांवर वर्चस्व मिळवले आहे. तर एकनाथ शिंदे गटाला ४ आणि भाजपला ३ जागा मिळाल्या आहेत.
पुणे जिल्ह्यात महाविकास आघाडीला एकही जागा मिळाली नाहीये. अनेक ठिकाणी महायुतीतीलच घटक पक्षांची चुरशीची लढत झाली आहे. त्यामध्ये अजितदादांनी बाजी मारल्याचे समोर आले आहे. एकनाथ शिंदे गटानेही आपले उमेदवार निवडून आणले आहेत. या निकालानंतर एकनाथ शिंदे यांनी माध्यमांशी संवाद साधताना आता खरी शिवसेना कोणाची असं म्हणत एकनाथ शिंदेंनी उद्धव ठाकरेंना टोला लगावला आहे. तर अजित पवारांनी बघा पुणे जिल्ह्यात कुणाचे वर्चस्व असं म्हणत मिश्किल टिपण्णी केली आहे. संपूर्ण राज्यात महायुतीला २०० पेक्षा अधिक जागा मिळाल्या आहेत. तर महाविकास आघाडीला ५० च्या आसपास जागा मिळाल्या आहेत.
पुणे जिल्ह्यातील नगराध्यक्ष विजयी उमेदवार - (Pune Nagaradhyaksha Winners Name List)
बारामती - नगराध्यक्षपदी सचिन सातव (राष्ट्रवादी अजित पवार गट)
लोणावळा - नगराध्यक्षपदी राजेंद्र सोनवणे (राष्ट्रवादी अजित पवार गट)
दौंड - नगराध्यक्षपदी दुर्गादेवी जगदाळे (राष्ट्रवादी अजित पवार गट)
तळेगाव दाभाडे - नगराध्यक्षपदी संतोष दाभाडे (भाजप)
चाकण - नगराध्यक्षपदी मनीषा सुरेश गोरे (शिवसेना शिंदे गट)
जुन्नर - नगराध्यक्षपदी सुजाता मधुकर काजळे (शिवसेना शिंदे गट)
आळंदी - नगराध्यक्षपदी प्रशांत कुऱ्हाडे (भाजप)
शिरूर - नगराध्यक्षपदी ऐश्वर्या पाचर्णे (राष्ट्रवादी अजित पवार गट)
सासवड - आनंदी काकी जगताप (भाजप)
जेजुरी - नगराध्यक्षपदी जयदीप बारभाई (राष्ट्रवादी अजित पवार गट)
भोर - नगराध्यक्षपदी रामचंद्र आवारे (राष्ट्रवादी अजित पवार गट)
इंदापूर - नगराध्यक्षपदी भरत शहा (राष्ट्रवादी अजित पवार गट)
राजगुरुनगर - नगराध्यक्षपदी मंगेश गुंडाळ (शिवसेना शिंदे गट)
वडगाव - नगराध्यक्षपदी अबोली ढोरे (राष्ट्रवादी अजित पवार गट)
फुरसुंगी - नगराध्यक्षपदी संतोष सरोदे (राष्ट्रवादी अजित पवार)
मंचर - नगराध्यक्षपदी राजश्री दत्तात्रय गांजाळे (शिवसेना शिंदे गट)
माळेगाव - नगराध्यक्षपदी सुजय सातपुते (राष्ट्रवादी अजित पवार गट)