शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदीजी घाबरलात का? तुम्हाला कसं माहिती अदानी-अंबानी टेम्पोतून पैसे देतात? राहुल गांधींची टीका
2
भारताच्या लोकसंख्येत हिंदू 6 टक्क्यांनी घटले, मुस्लीम समाजाचा टक्का वाढला; सरकारी पॅनलनं केला 65 वर्षांचा अभ्यास
3
वादावर पडदा? सॅम पित्रोदांनी दिला IOC अध्यक्षपदाचा राजीनामा, पक्षानेही तात्काळ स्वीकारला
4
काँग्रेसची धुळधाण हीच खरी देशभक्ती; एकनाथ शिंदेंची संगमनेरात जोरदार टीका
5
"विचित्र बडबड करणं सॅम पित्रोदांचा स्वभाव, त्यांनी भारताचा अपमान केलाय"; रामदास आठवलेंची शाब्दिक चपराक
6
इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेत नोकरीची संधी, 'या' तारखेपूर्वी उमेदवार करू शकतात अर्ज
7
मी दक्षिण भारतातील असून भारतीय दिसते; अभिनेत्रीचं सॅम पित्रोदांना चोख प्रत्युत्तर
8
CM केजरीवालांना तुरुंगात ऑफिस सुरू करण्यासाठी याचिका; कोर्टाने ठोठावला 1 लाखाचा दंड
9
"कुमारस्वामी हे ब्लॅकमेलिंगचे बादशहा अन् रेवन्ना कहाणीचे दिग्दर्शक-निर्माते", डीके शिवकुमार यांचा आरोप
10
"ते स्वतःच माणसासारखे कमी अन् पक्ष्यासारखे जास्त दिसतात..."; सॅम पित्रोदांच्या वक्तव्यावर कंगना भडकली 
11
पवार कुटुंबीयांनी पुन्हा एकदा एकत्र यावं, अशी माझी इच्छा - छगन भुजबळ
12
लखनौला बसले धक्के; भुवीच्या चेंडूवर नितीश रेड्डी, सनवीर सिंग यांनी अविश्वसनीय झेल टिपले 
13
"...तर राम मंदिराला 'बाबरी' नावाचं कुलूप लावलं जाईल", अमित शाहांचा काँग्रेसवर हल्लाबोल
14
"यातून गांधी परिवाराची मानसिकता..."; स्मृती इराणी यांनी सॅम पित्रोदांच्या वादग्रस्त विधानाचा घेतला समाचार
15
“उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात मुंबईतील मराठी माणूस निर्वासित झाला”; देवेंद्र फडणवीसांची टीका
16
Amit Shah : "...तर तुरुंगातही जाल"; अमित शाह यांचं अखिलेश यादव आणि राहुल गांधींवर टीकास्त्र
17
६०० पैकी ५७२ गुण मिळाले! पण टॉपर न आल्याने १६ वर्षीय तरूणीचं टोकाच पाऊल
18
SRH vs LSG सामना पावसामुळे रद्द झाला तर काय होईल? मुंबई इंडियन्सला म्हणावं लागतंय, जारे जारे पावसा... 
19
अजित पवारांच्या राष्ट्रवादीला महाराष्ट्रात खातेही उघडता येणार नाही- शरद पवार गटाचा खोचक टोला
20
PM मोदींचे मुस्लिम समाजाला पहिल्यांदाच थेट आवाहन अन् खास मंत्र्याने घेतली भेट; चर्चेला उधाण...

प्राध्यापकांची सायकलवर पुणे-कन्याकुमारी सफर

By ऑनलाइन लोकमत | Published: December 17, 2018 2:16 AM

पर्यावरण वाचवा संदेश : मॉडर्न महाविद्यालयात कार्यरत

पाषाण : मॉडर्न महाविद्यालय गणेशखिंड, येथील तीन प्राध्यापकांनी नुकतीच पुणे- कन्याकुमारी ही सायकल यात्रा पूर्ण केली. पुणे ते कन्याकुमारी असे सोळाशे किलोमीटर अंतर या प्राध्यापकांनी बारा दिवसांत पूर्ण केले. प्रा. डॉ. संजय पाटील, डॉ. दीपक शेंडकर, प्रा. नामदेव डोके व नामदेव मनशेटवार व समृद्धी शेंडकर यांनी १० नोव्हेंबर रोजी आपला सायकल प्रवास सुरू केला. पुणे- कोल्हापूर - बेळगाव - धारवड - दावनगिरी- चित्रदूर्ग -तुमकूस- बंगळुरू- सेलम - मदुराई-तिरुनेलवेल्ली -कन्याकुमारी अशी दरमजल करीत त्यांनी १६०० किमीचा प्रवास पूर्ण केला.

एक रोमांचक व आत्मविश्वास वाढविणारा हा प्रवास ठरला. या आधी या प्राध्यापकांनी पुणे ते गोवा ५०० किमी चार दिवसांत, तर अष्टविनायक ६५० किमी सायकल यात्रा पाचदिवसांत पूर्ण केलेली आहे. या मध्ये आता पुणे ते कन्याकुमारी या नवीन सफरीची भर पडली. या सायकल मोहिमेत अनेक समस्यांना सामोरे गेल्याचे त्यांनी सांगितले. सायकल पंक्चर होणे, दक्षिणेकडील उष्ण तापमान, गाझा चक्रीवादळाच्या वाऱ्याचा व पावसाचा प्रतिरोध अनेक चढ-उतार यांचा सामना करीत ही सायकल वारी पूर्ण केली. यापूर्वीचा अनुभव गाठीशी असला, तरी हा प्रवास शारीरिक व मानसिक कसोटींना आव्हान देणारा ठरला.पेट्रोल वाचवा संदेशपेट्रोल वाचवा, पर्यावरण वाचवा हा या सायकल मोहिमेचा मुख्य हेतू होता, रस्त्यावरून जाताना त्यांनी अनेक शाळा-महाविद्यालये, बसस्टँड येथे हा संदेश दिला. दक्षिणेकडील प्रवासात द्रविडी भाषेशिवाय पर्यायाने केळीच्या पानावरील भात-रस्सम, इडली-सांबर व परोठ्यांचा पाहुणचार, हिंदी- इंग्रजीशिवाय हातवाºयांची भाषा, शाळकरी विद्यार्थ्यांचे कन्नड व तमिळीतील संभाषण यामुळे सायकलयात्रेचा अनुभव आला.आरोग्यासाठी...४आजच्या या धावपळीच्या जीवनात अनेकजण आरोग्यासाठी धडपडत असतात. आपण अगदी छोट्या- छोट्या गोष्टींमधूनही आरोग्यदायी जीवन जगू शकतो, सायकल चालवा हाच संदेश घेऊन ते निघाले होते.४विद्यार्थ्यांसाठी मॉडर्न सायकलिंग क्लबची स्थापना करून त्याद्वारे सायकलची आवड निर्माण करण्याचा मनोदय आहे, या सायकल मोहिमेसाठी प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटीचे डॉ. गजानन एकबोटे यांचे मार्गदर्शन व प्राचार्य डॉ. संजय खरात यांचे सहकार्य लाभले. 

टॅग्स :Puneपुणे