शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
7
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
8
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
9
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
10
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
11
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
12
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
13
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
14
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
15
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
16
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
17
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
18
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
19
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
20
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
Daily Top 2Weekly Top 5

Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 18, 2025 20:59 IST

जेजुरीकडून मोरगाव कडे जात असताना श्रीराम ढाब्या समोर पिकअप टेम्पोला ( क्र. एम एच १२ एक्स एम  ३६९४ ) मधील साहित्य खाली करीत असताना जोरदार धडक दिली.

जेजुरी -  मोरगाव रस्त्यावरील किर्लोस्कर कंपनीजवळील श्रीराम ढाब्यासमोर भरधाव वेगात आलेल्या कारने थांबलेल्या पिकअप टेम्पोला धडक देऊन शेजारीच उभा असलेल्या कारवर आदळली. हा अपघात इतका भीषण होता की, जागेवरच आठ जणांचा मृत्यू झाला तर पाच जण गंभीर जखमी झाले आहेत. हा अपघात बुधवारी (दि. १८) सायंकाळी ७.३० वाजण्याच्या सुमारास घडला आहे.

सोमनाथ रामचंंद्र वायसे, रामु संजीवन यादव (दोघेही रा. नाझरे कप ता. पुरंदर), अजय कुमार चव्हाण (रा. उत्तरप्रदेश) अजित अशोक जाधव (रा. कांजळे, ता. भोर), किरण भारत राऊत (रा. पवारवाडी, ता. इंदापूर), अक्षय शंकर राऊत ( रा. झारगडवाडी, ता. इंदापूर) अश्विनी शंकर ऐसार (रा. नागनसूर हेद्रे, सोलापूर) अशी मृतांची नावे असून अन्य एकाची ओळख पटू शकली नाही. तर जखमींची नावेही रात्री उशिरापर्यंत समजू शकली नाही.

याबाबत घटना स्थळावरून मिळालेली माहिती अशी की, बुधवारी सायंकाळी पुण्याहून माेरगावच्या दिशेने बुधवारी वेगाने जाणाऱ्या कारने (क्र. एम एच ४२ ए एक्स १०६०) जेजुरी येथील श्रीराम ढाब्या समोर साहित्य उतरवण्यासाठी थांबलेल्या पिकअप टेम्पोला जोराची धकड दिली. ही धडक इतकी जोरात होती की, ही कार टेम्पोच्या बाजूला असणाऱ्या कार ( क्र.एम एच १२ टी के ९४८३) वर आदळली. या भीषण अपघातात टेम्पो मधील वस्तू खाली करणारे दोघेजण, श्रीराम ढाब्यासमोर उभे असणारे तिघे तर कार मधील तिघे जण जागेवरच ठार झाले. तर दोन मुले, एक महिला, दोन पुरुष असे पाच जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींवर खासगी रुग्णालयात उपचार सुरु असून त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.

टॅग्स :PuneपुणेAccidentअपघातMaharashtraमहाराष्ट्रPoliceपोलिसJejuriजेजुरीBaramatiबारामती