Pune: सिंहगड घाटात पर्यटकांनी भरलेली जीप उलटली, १० ते १२ जण जखमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 18, 2023 09:47 IST2023-12-18T09:47:13+5:302023-12-18T09:47:47+5:30

जखमींना तत्काळ जवळच्या खाजगी रुग्णालयात करण्यात आले आहे...

Pune: Jeep full of tourists overturned at Sinhagad Ghat, 10-12 injured | Pune: सिंहगड घाटात पर्यटकांनी भरलेली जीप उलटली, १० ते १२ जण जखमी

Pune: सिंहगड घाटात पर्यटकांनी भरलेली जीप उलटली, १० ते १२ जण जखमी

पुणे : सिंहगड घाटात पर्यटकांना घेऊन जाणारी जीप उलटली आहे. या अपघातात १० ते १२ जण जखमी झाले आहेत. ही घटना काल सायकाळी (रविवारी) घडली. सुदैवाने यामध्ये कुणाचा मृत्यू झालेला नाही. अपघातानंतर जखमींना तत्काळ जवळच्या खाजगी रुग्णालयात करण्यात आले आहे.

सिंहगड पायथा येथून गडावर पर्यटकांना जाण्यासाठी जीपची वाहतूक सुरु आहे. मात्र हीच वाहतूक आता जीवघेणी ठरत आहे. या दुर्घटनेमुळे सिंहगड घाट रस्त्यावरील वाहतूक नियोजन व नियमनाचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. सिंहगड घाट रस्त्यावरील अकरा हजार वळणाजवळ बारा ते पंधरा पर्यटक घेऊन गडावरुन खाली येत असलेली जीप उलटली आहे. 

Web Title: Pune: Jeep full of tourists overturned at Sinhagad Ghat, 10-12 injured