पुणे : प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेता मध्य रेल्वेच्या पुणे विभागाकडून काही गाड्यांचा कालावधी वाढविण्यात आला आहे. त्यामध्ये पुण्यातून सुटणारी पुणे-जबलपूर-पुणे गाडी अहिल्यानगर, भुसावळ, जबलपूर मार्गावरील प्रवाशांसाठी पर्यायी गाडी म्हणून उपलब्ध झाली; मात्र या गाडीचा २ मार्च २०२६ पर्यंत असलेला कालावधी वाढविण्यात आला असून, आता ही गाडी २०३० पर्यंत पुण्यातून प्रत्येक सोमवारी तर जबलपूरहून प्रत्येक रविवारी सुटेल.
पुणे-जबलपूर-पुणे साप्ताहिक विशेष गाडीच्या सध्याच्या सेवा दिवस, वेळापत्रक, रचना आणि थांब्यांत कोणताही बदल करण्यात आलेला नाही. गाडी क्रमांक ०२१३२ जबलपूर-पुणे विशेष गाडी आठवड्याच्या प्रत्येक रविवारी जबलपूर येथून सुटेल. ही गाडी एक मार्चपर्यंत अधिसूचित होती. आता तिचा कालावधी दि. २९ डिसेंबर २०३० पर्यंत वाढवण्यात आला आहे. तसेच गाडी क्रमांक ०२१३१ पुणे-जबलपूर विशेष गाडी आठवड्याच्या प्रत्येक सोमवारी पुण्यातून सुटेल.
ही गाडी दोन मार्चपर्यंत अधिसूचित होती. आता तिचा कालावधी ३० डिसेंबरपर्यंत वाढवण्यात आला आहे. त्यामुळे प्रवाशांना पुढील चार वर्षे या गाडीचा प्रवास अनुभवता येणार असून, अहिल्यानगर, भुसावळ, बऱ्हाणपूर, मदन महल मार्गावर आणखीन एक गाडी उपलब्ध झाली आहे.
Web Summary : The Pune-Jabalpur weekly special train service is extended until December 2030, benefiting passengers on the Ahilyanagar-Bhusawal route. The train will depart Pune every Monday and Jabalpur every Sunday, with no changes to schedule or stops.
Web Summary : पुणे-जबलपुर साप्ताहिक विशेष ट्रेन सेवा को दिसंबर 2030 तक बढ़ाया गया, जिससे अहिल्यानगर-भुसावल मार्ग के यात्रियों को लाभ होगा। ट्रेन हर सोमवार को पुणे से और हर रविवार को जबलपुर से रवाना होगी, समय या स्टॉप में कोई बदलाव नहीं होगा।