शहरं
Join us  
Trending Stories
1
Balendra Shah: काठमांडूचे 'रॅपर', महापौर बालेंद्र शाह होणार नेपाळचे नवे पंतप्रधान?
2
डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताबद्दल लिहिली भलीमोठी पोस्ट; मग मोदी काय म्हणाले? वाचा
3
रशिया-युक्रेन युद्धात 'या' देशानं मारली उडी; रशियन ड्रोन्स पाडले, F 16 लढाऊ विमाने हवेत झेपावली
4
धनत्रयोदशी-दिवाळीपर्यंत कुठवर पोहोचणार सोन्याचा दर? आता आहे ₹१.१२ लाखांच्या पार, खरेदीपूर्वी पाहाच
5
'ही' छोटी कार आता ३ लाख रुपयांपर्यंत स्वस्त; जीएसटी कपातीमुळे नवीन किंमती जाहीर
6
नेपाळमध्ये लष्कराने सूत्रं हातात घेतली, एअर इंडिया-इंडिगोची विमान उड्डाणे रद्द
7
आता टेन्शन फ्री होईल मध्यम वर्ग; या ५ सरकारी स्कीम करतील तुमची रिटायरमेंट आणि सेव्हिंग सुपर सेफ, पाहा कसं?
8
कोणत्या खासदारांनी क्रॉस व्होटिंग केली? सर्वत्र चर्चा; महाराष्ट्रासह 'या' राज्यातील खासदार संशयाच्या भोवऱ्यात
9
"त्याला उचकी आली आणि...", 'अशी ही बनवा बनवी'मधील शंतनूचं असं झालं निधन, पत्नीचा खुलासा
10
Prithvi Shaw: सपना गिल विनयभंग प्रकरणात न्यायालयाने पृथ्वी शॉला ठोठावला १०० रुपयांचा दंड!
11
Stock Markets Today: शेअर बाजार सुस्साट, निफ्टी २५,००० च्या पार; IT-रियल्टी शेअर्समध्ये जोरदार तेजी
12
सी. पी. राधाकृष्णन : संघस्वयंसेवक ते उपराष्ट्रपतिपदापर्यंतचा चढता आलेख
13
जे कोणालाच जमलं नाही ते आर्यन खानने केलं, 'बॅड्स ऑफ बॉलिवूड'मधून दिलं मोठं सरप्राईज
14
Asia Cup 2025: सूर्यकुमारने पाकिस्तानच्या कर्णधाराशी हात मिळवला की नाही? Video झाला व्हायरल
15
Crime: संतापजनक! चालत्या कॅबमध्ये विद्यार्थिनीसमोर हस्तमैथुन, चालकाला अटक!
16
Genz Protests Nepal: तरुणाईच्या आगीत नेपाळ स्वाहा! नेत्यांच्या भ्रष्टाचाराने जेरीस, सोशल मीडिया बंदीने ओतले तेल
17
हैदराबाद गॅझेटियरनंतर सरकारची नवी हालचाल; मराठा उपसमितीने उचलले महत्त्वाचे पाऊल 
18
"मी भाऊ कदमकडून खूप काही शिकलो", मनोज वाजपेयीकडून अभिनेत्याचं भरभरुन कौतुक, म्हणाला...
19
भारताच्या 'आयटी'वर नवे संकट! 'या' कंपन्यांवर २५ टक्के कर लावण्याचा अमेरिकी खासदाराचा प्रस्ताव
20
'भारत-अमेरिका पक्के मित्र, व्यापार करारावर चर्चा सुरू'; ट्रम्प यांच्या पोस्टला पंतप्रधान मोदींचे उत्तर

पादचाऱ्यांसाठी पुणे असुरक्षितच! वर्षभरात १२० जणांचा मृत्यू, निम्याहून अधिक फुटपाथवर अतिक्रमण

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 9, 2024 10:40 IST

अनेक फुटपाथवर पथारी व्यावसायिक, हातगाडी, छोटे व्यावसायिक यांनी अतिक्रमण केले असून दुचाकी, चारचाकी यांचे पार्किंगची झाले आहे

राजू हिंगे

पुणे : स्मार्ट सिटी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पुणे शहरातील अनेक भागात रस्ते रुंद झाले. त्याचबराेबर ठराविक भागात फुटपाथ देखील प्रशस्त झाले, तरीही शहराच्या वाहतूक व्यवस्थेत पादचारी दुर्लक्षितच राहिला आहे. कारण शहरात ८२६ किलोमीटरचे रस्ते विनाफुटपाथ आहेत. सुमारे ५७४ किलोमीटरच्या रस्त्यावर फुटपाथ असला तरी त्यातील निम्म्याहून अधिक फुटपाथ अतिक्रमणांनी गिळंकृत केला आहे. या वाढत्या अतिक्रमणांमुळे अपघातास निमंत्रण मिळत असून, गेल्या वर्षभरात १२० पादचाऱ्यांचा अपघातात मृत्यू झाला आहे. यावरून पादचाऱ्यांसाठी पुणे असुरक्षितच असल्याचे स्पष्ट झाले आहे.

पुणे शहरात सुमारे १ हजार ४०० किलोमीटर लांबीचे रस्ते आहेत. शहरातील रस्ते हे पुणे महापालिकेच्या मालकीचे आहेत. शहरात रस्ते तयार करताना नागरिकांना पायी चालता यावे, तसेच कुठल्याही अडथळ्याविना त्यांना चालता यावे, यासाठी फुटपाथ तयार केले आहेत. पण, अनेक फुटपाथवर पथारी व्यावसायिक, हातगाडी, छोटे व्यावसायिक यांनी अतिक्रमण केले आहे. अनेक दुकानदार, कार्यालयातील कर्मचारी फुटपाथवरच दुचाकी, चारचाकी वाहने उभी करतात.

आधीच असुरक्षित, त्यात अरेरावी...

विक्रेत्यांनी फुटपाथवर दुकाने थाटल्यामुळे पादचाऱ्यांना रस्त्यावरून चालावे लागते. त्यामुळे वाहतूककोंडीने हैराण असलेल्या पुणेकरांना फुटपाथवरून चालतानाही वाहनचालकांच्या अरेरावीला सामोरे जावे लागत आहे. पुणे महापालिकेने शहराच्या विविध भागांतील फुटपाथवर नागरिकांनी दुचाकी वाहने चालवू नयेत. अतिक्रमण करू नये, यासाठी सिमेंटचे ठाेकळे बसविले आहेत. पण, अनेक ठिकाणच्या फुटपाथवरील सिमेंटचे ठोकळे ताेडण्यात आले आहेत. त्यामुळे फुटपाथवरून दुचाकीधारक बिनधास्तपणे वाहने चालवतात.

वर्षभरात १२० पादचाऱ्यांच्या मृत्यू

शहरातील वाहतुकीची समस्या दिवसेंदिवस जटील होत चालली आहे. वाहतूक विषयक समस्या, तसेच उपाययोजनांबाबत सेव्ह पुणे ट्रॅफिक मूव्हमेंट संस्थेकडून अपघाती मृत्यूंची वार्षिक आकडेवारी संकलित करण्यात येत असून, आकडेवारी अभ्यासण्यात येत आहे. पुणे शहरात २०२३ या वर्षभरात झालेल्या अपघातात ३५० नागरिकांचा मृत्यू झाला. दुचाकीस्वाराचे मृत्यू सर्वात जास्त म्हणजे १९२ आहे. त्या खालाेखाल पादचाऱ्यांचे १२० मृत्यू झाले आहेत. पादचाऱ्यांच्या अपघाताच्या संख्येमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. २०२२ मध्ये अपघतातमध्ये पादचाऱ्यांचे १०६ मृत्यू झाले होते. प्रामुख्याने रस्ता ओलांडताना वेगाने आलेल्या वाहनाने दिलेली धडक आणि पाठीमागून आलेल्या वाहनांनी पादचाऱ्यांना दिलेली धडक या दोन कारणांमुळे अधिक अपघात होत आहेत.

पादचारी सिग्नल पाळलेच जात नाही

शहरातील रस्त्यांवर वाहनाबरोबरच पादचाऱ्यांना रस्ता ओलांडता यावा, यासाठी सिग्नलमध्ये वेळ दिलेला असतो. पण, अपवाद वगळता तो कोणीही पाळताना दिसत नाही. काही ठिकाणी, तर चौकातील वाहतूक पोलिस पादचाऱ्यांसाठी असलेल्या वेळेत वाहने पुढे जाण्यास सांगतात. वाहनांना पुढे पाठवून चौक मोकळा करण्याकडे वाहतूक पोलिस महत्त्व देताना दिसतात.

पादचाऱ्यांसाठीचा निधीही पळविला

पुणे महापालिकेने पादचारी धोरणाला मान्यता दिली. त्यानंतर या धोरणाच्या अंमलबजावणीसाठी सातत्याने प्रत्येक आथिक वर्षाच्या बजेटमध्ये तरतूद केली. परंतु, प्रत्येकवेळी हा निधी वेगवेगळ्या कारणांनी वर्गीकरण करून पळविण्यात आला आहे.

पोलीस घेतात बघ्याची भूमिका

पेव्हर ड्रायव्हिंग नियमानुसार फुटपाथवरून वाहने चालविल्यास २०० रुपये दंड आकारला जातो. फुटपाथवर पार्किंग केल्यास एक हजार रुपये दंड आकारला जातो. पण, फुटपाथवरून वाहने जातानाही अनेकदा पोलिस बघ्याची भूमिका घेतात.

हे आहेत नियम

शहरातील सर्व मुख्य रस्त्यांवर फुटपाथ आहेत; पण काही रस्त्यांवर ते तुटक स्वरूपात आहेत. नियमानुसार फुटपाथची रुंदी किमान १.८ मीटर आणि रस्त्यापासून १५० मि.मी. उंच असणे आवश्यक आहे. रस्त्यांच्या पातळीनुसार अपवादात्मक परिस्थितीत नियमापेक्षा उंच असल्यास रॅम्प किंवा पादचाऱ्यांची रचना करण्यात येते.

पादचारी सुरक्षितता धोरण कागदावरच

महापालिकेने मोठा गाजावाजा करून ‘पादचारी सुरक्षितता धोरण’ आठ वर्षांपूर्वीच तयार केले होते. त्यात शहरातील खासगी वाहनांची वाढती संख्या लक्षात घेऊन या धोरणात पादचाऱ्यांना विविध प्रकारच्या सोयी-सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. वाहतूक पोलिस आणि महापालिका अधिकाऱ्यांची जबाबदारीही निश्चित करण्यात आली आहे. पादचाऱ्यांना कमीत कमी वेळेत रस्ता ओलांडता यावा यासाठी पादचारी मार्गाची निर्मिती, प्रमुख रस्त्यांवर पुरेशा जागांची उपलब्धता, अशा बाबी या धोरणात आहे. पादचाऱ्यांसाठी धोरण तयार करणारी पुणे ही देशातील पहिली महापालिका ठरली आहे. पण, या धोरणाची अंमलबजावणीच झालेली नसल्याने अधिकाऱ्यांची पादचाऱ्यांबाबतची उदासीनता यातून स्पष्ट होत आहे.

पुणे महापालिकेने एक दिवस पादचारी दिन साजरा न करता वर्षभर पादचाऱ्यांची काळजी घेतली पाहिजे. शहरातील केवळ १० टक्के फुटपाथ सुस्थितीत आहेत. पालिका रस्ते तयार करताना वाहनचालकांना प्राधान्य देते. परंतु, पादचाऱ्यांचा विचार करत नाही. ‘पादचारी सुरक्षितता धोरण’ कागदावरच आहे. त्यांची अंमलबजावणी केली पाहिजे. - प्रशांत इनामदार, पादचारी प्रथम

‘पादचारी रस्त्यांवरून चालत असतील, तर पदपथाचे डिझाइन कुठेतरी चुकले असणार’ ही खूणगाठ मनाशी बांधून असे पदपथ सुधारले पाहिजेत. दुर्दैवाने, पदपथ रुंद करायचा मुद्दा निघाला की, ‘पदपथ रुंद केला की, त्यावर पथारीवाले येतात’, अशा सबबीखाली तो मोडीत काढला जातो. पण, पदपथच नाहीत, अशा रस्त्यांवरही पथारीवाले दिसतातच. मग, रस्तेही बांधायचे नाहीत का? तेव्हा, पथारीवाले जिथे ग्राहक मिळतील अशा ठिकाणीच येतात, हे लक्षात घ्यायला हवे. त्यांनाही पदपथांवर योग्य प्रमाणात, सुनियोजित जागा देऊन, पादचाऱ्यांना सोयीस्कर असलेले पदपथ बनवणे अत्यावश्यक आहे. - हर्षद अभ्यंकर, संचालक, सेव्ह पुणे ट्राफिक मूव्हमेंट

टॅग्स :PuneपुणेAccidentअपघातDeathमृत्यूPune Municipal Corporationपुणे महानगरपालिकाSenior Citizenज्येष्ठ नागरिकcarकारbikeबाईक