कात्रज : दक्षिण पुण्यातील नागरिकांची वाहतूक सुरळीत व्हावी कात्रज तसेच कोंढवा परिसरातील वाहतूक समस्या दूर करण्यासाठी, महापालिकेने कात्रज-कोंढवा रस्ता रुंदीकरणाचे काम हाती घेतले. या प्रकल्पाचा पायाभरणी समारंभ२ नोव्हेंबर २०१८ रोजी त्यावेळचे व सध्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत झाला होता.
सात वर्षे उलटून गेले तरी हा रस्ता आणखी रखडलेलाच आहे. त्यामुळे हा रस्ता नागरिकांच्या सोयीसाठी करण्यात आला आहे की ठेकेदाराला पोसण्यासाठी आहे हाच प्रश्न नागरिकांना पडला आहे. वारंवार या रस्त्यासाठी मुदतवाढ मिळत असून जागा हस्तांतरणाअभावी अद्याप रस्त्याचे काम पूर्णत्वाकडे गेलेले नाही.
परिणामी कात्रज-कोंढवा रस्त्यावर कात्रज चौकापासून खडीमशीन चौकापर्यंत सकाळ संध्याकाळी अनेक वेळा वाहतूककोंडी झाल्याचे पहायला मिळते. त्यामुळे कात्रज-कोंढवा रस्ता हा नागरिकांसाठी आहे का ठेकेदारांसाठी असा सवाल उपस्थित केला जात आहे. कात्रज-कोंढवा रस्त्याचे काम करणाऱ्या ठेकेदाराकडून नियमाप्रमाणे या ठिकाणी बोर्डदेखील पहायला मिळत नाही. तसेच नियम पाळले जात नाहीत. अथवा या नियमांना महत्त्व न देता याला फाट्यावर मारले जाते. सर्वसामान्य नागरिक मात्र यापासून अनभिज्ञ असतो. कामामध्ये पारदर्शकता असावी अशी अपेक्षा आहे.
हा रस्ता यमदुताचा मार्गकात्रज - कोंढवा रस्ता म्हणजे यमदुताचा मार्ग असल्याचे मानले जाते. येथे दररोज किरकोळ अपघात होतातच मोठ्या अपघातात अनेकांचे जीव गेले आहेत. त्यामुळे येथील काम तातडीने होणे अपेक्षित आहे.
कामाची माहिती देणारा फलक लावलाच नाहीमहानगरपालिका, सार्वजनिक बांधकाम विभाग व इतर शासकीय यंत्रणांच्या नियमांनुसार काम सुरू होताना व काम चालू असताना माहिती फलक लावणे अनिवार्य आहे. यामागचा उद्देश पारदर्शकता आणि नागरिकांना माहिती देणे हा आहे.
माहिती फलकावर कोणती माहिती असावी?कामाचे नाव व स्वरूप, कामाचा आदेश क्रमांक, मंजूर खर्च (रक्कम), ठेकेदाराचे नाव व संपर्क क्रमांक, काम सुरू होण्याची तारीख, काम पूर्ण करण्याची अपेक्षित तारीख, संबंधित विभाग /अभियंता यांचे नावनिधीचा स्रोत (महानगरपालिका / राज्य / केंद्र)फलक न लावल्यास काय ?संबंधित अभियंता ठेकेदारास नोटीस देऊ शकतो कामाची देय रक्तम अडवली जाऊ शकते तसेच करारातील अटींनुसार दंडात्मक कारवाई होऊ शकते. नागरिकांनी तक्रार केल्यास चौकशीदेखील होऊ शकते. मात्र तक्रार यायला हवी.
कोणत्याही रस्त्याचे काम सुरू सुरू असल्यास काम सुरू होण्याच्या सुरुवातीला व शेवटी त्या संदर्भात बोर्ड लावणे अपेक्षित असते जर कोणत्याही प्रकारचा बोर्ड लावला नसेल तर तशा सूचना देण्यात येतील. - राजेश बनकर, मुख्य अभियंता पथ विभाग कात्रज-कोंढवा रस्त्याचे काम अनेक वर्षांपासून सुरू आहे. या रस्त्यावर कोणत्याही प्रकारे कामाबाबत माहिती दिसून येत नाही. नागरिकांच्या पैशातून होणाऱ्या कामाची माहिती नागरिकांना का समजू नये. यामध्ये पारदर्शकता असणे महत्त्वाचे आहे. - शुभम पवार, नागरिक
Web Summary : The Katraj-Kondhwa road widening project, initiated in 2018, remains incomplete after seven years. Traffic congestion persists, raising concerns about whether the project benefits citizens or contractors. Lack of transparency and safety issues plague the delayed construction.
Web Summary : कात्रज-कोंढवा सड़क चौड़ीकरण परियोजना, जो 2018 में शुरू हुई, सात साल बाद भी अधूरी है। यातायात जाम जारी है, जिससे चिंताएं बढ़ रही हैं कि क्या परियोजना नागरिकों को लाभान्वित करती है या ठेकेदारों को। पारदर्शिता और सुरक्षा मुद्दों की कमी से निर्माण में देरी हो रही है।