शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
4
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
5
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
6
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
7
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
8
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
9
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
10
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
11
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
12
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
13
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
14
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
15
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
17
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
18
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
19
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
20
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
Daily Top 2Weekly Top 5

Pune: ज्येष्ठांसमोर घरातीलच वडीलधारे समजून पाया पडणारे बापट; आठवण कसबा विधानसभेची

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 13, 2024 15:32 IST

कसब्यातील सामान्य नागरिकांबरोबर अशा प्रकारे नम्रतेने वागून हा मतदारसंघ बापटांनी सलग ५ टर्म स्वत:जवळ ठेवला

राजू इनामदार 

पुणे: निवडणुकीत उमेदवाराला काय करावे लागेल ते कधीच सांगता येत नाही. सर्वात पहिली गोष्ट म्हणजे अंगी प्रचंड नम्रता बाणवावी लागते. ती नसेल तर काय होते ते अलीकडेच माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांची एक चित्रफीत समाजमाध्यमांवरून प्रसारित झाली त्यावरून दिसते. पण ती वेगळी गोष्ट. नम्रतेबरोबरच उमेदवाराला आणखीनही बरेच कायकाय करावे लागते. पायी भरपूर फिरावे लागते. दिसेल त्याला हात जोडावे लागतात. चेहऱ्यावर सतत हास्य ठेवावे लागते. चिडता येत नाही, रागावता येत नाही, वाईट काही बोलता येत नाही.  कार्यकर्ते साहेब, साहेब म्हणत असतात, पण ते सांगतील त्या भागात जावे लागते, ते सांगतील ते करावेच लागते.

अशा गोष्टी करण्यात पुण्यातील भाजपचे दिवंगत गिरीश बापट हे या सर्वच बाबतीत फारच प्रसिद्ध होते. ते कधीही दमत नसत, थकत नसत. निवडणूक काळात, त्यांच्या स्वत:च्या व पक्षातील इतरांच्याही, कुठेही जायची व कितीही फिरायची त्यांची तयारी असे. कसबा विधानसभा त्यांनी सलग ५ टर्म स्वत:जवळ ठेवला. त्याआधी ते ४ वेळा महापालिकेत नगरसेवक होते. अखेर खासदारही झाले. गल्लीपासून दिल्लीत गेलेला, लोकशाही व्यवस्थेतील सर्व सभागृहात सदस्य म्हणून राहिलेला मी एकमेव असे ते अभिमानाने सांगत.

हे छायाचित्र त्यांच्याच एका प्रचारफेरीतील आहे. कसबा विधानसभेतीलच. समोर सगळे ज्येष्ठ बसलेले आहेत. त्यातील बहुतेक खुर्चीवर बसलेले. बापट त्यांच्यासमोर बसलेले नाहीत. उलट प्रत्येकाच्या अगदी खाली वाकून घरातीलच कोणी वडिलधारे आहेत असे समदून पाया पडत आहेत. त्यांची ही नम्रताच त्यांना सातत्याने निवडून देत असावी.

टॅग्स :Puneपुणेmaharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४kasba-peth-acकसबा पेठgirish bapatगिरीश बापटPoliticsराजकारणBJPभाजपा