मुंबईपेक्षा 5-6 पट लहान असूनही कोरोनाबाधितांच्या संख्येत 'पुणे राज्यात नं 1'

By ऑनलाइन लोकमत | Published: August 18, 2020 11:53 AM2020-08-18T11:53:53+5:302020-08-18T11:55:25+5:30

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रवक्ते आणि पुण्यातील मैत्री स्ययंसेवी संघटनेचे स्वयंसेवक अनिल शिदोरे यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन पुणे आणि मुंबईतील कोरोनाबाधित रुग्णांची आकडेवारी शेअर केली आहे.

Pune has overtaken Mumbai, despite being 5-6 times smaller than Mumbai, Pune No. 1 among the coronaries, MNS anil shidore | मुंबईपेक्षा 5-6 पट लहान असूनही कोरोनाबाधितांच्या संख्येत 'पुणे राज्यात नं 1'

मुंबईपेक्षा 5-6 पट लहान असूनही कोरोनाबाधितांच्या संख्येत 'पुणे राज्यात नं 1'

Next
ठळक मुद्देमहाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रवक्ते आणि पुण्यातील मैत्री स्ययंसेवी संघटनेचे स्वयंसेवक अनिल शिदोरे यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन पुणे आणि मुंबईतील कोरोनाबाधित रुग्णांची आकडेवारी शेअर केली आहे.

पुणे : राज्य आरोग्य विभाग आणि जिल्हा आरोग्य विभागाच्या कोरोना रुग्णांच्या आकडेवारी मधील घोळ अजूनही सुरूच आहे. या घोळामुळे सर्वाधिक अ‍ॅक्टिव्ह रुग्णापाठोपाठ आता बाधितांची संख्याही राज्यात सर्वाधिक झाली. रविवारी राज्याच्या अहवालानुसार पुणे जिल्ह्याने मुंबईला मागे टाकत 1 लाख 30 हजारांचा टप्पा ओलांडला आहे. त्यामुळे जिल्हा कोरोनाचा हॉटस्पॉट बनला आहे. मात्र, जिल्हा आरोग्य विभागाच्या अहवालानुसार अजूनही पुणे मुंबईपेक्षा मागेच आहे. मात्र, पुण्यातील कोरोनाबाधितांची वाढती संख्या लक्षात घेता, पुण्यासाठी खास उपाययोजनांची गरज असल्यांच पुणेकरांचं म्हणणं आहे. 

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रवक्ते आणि पुण्यातील मैत्री स्ययंसेवी संघटनेचे स्वयंसेवक अनिल शिदोरे यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन पुणे आणि मुंबईतील कोरोनाबाधित रुग्णांची आकडेवारी शेअर केली आहे. त्यामध्ये, मुंबईची लोकसंख्या पुण्याच्या 5 ते 6 पट जास्त असूनही पुण्यानं मुंबईला कोरोनाबाधित रुग्णसंख्येत मागे टाकल्याचं त्यांनी सांगितलं. तसेच, पुण्यासाठी काही विशेष उपाययोजना हवी... असेही शिदोरे यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन म्हटले आहे.  

राज्य व जिल्हा आरोग्य विभागाच्या अहवालामध्ये पुण्यातील अ‍ॅक्टिव्ह रुग्णांच्या संख्येत मोठी तफावत आढळून येत आहे. ही बाब लोकमतने उजेडात आणल्यानंतर यंत्रणेला जाग आली. खुद्द मुख्यमंत्र्यांनी आकड्यांचा घोळ सुधारण्याची सूचना केली. जिल्ह्याची 'स्मार्ट' यंत्रणा उघडी पडल्याने बदल करण्यास सुरुवात झाली. कोविड केअर सेंटरवर घरी सोडण्यात येणाऱ्या रुग्णांची माहिती भरली जात नसल्याचे लक्षात आले. पण हे बदल काही दिवसांचेच ठरले. आज पुन्हा जैसे थे स्थिती झाली आहे. आता एकूण बाधित रुग्णांमध्येही पुणे राज्यात सर्वात पुढे गेल्याने पुन्हा प्रश्न निर्माण झाले आहेत.

राज्याचा अहवालानुसार, रविवारी पुण्यात सुमारे 1 लाख 30 हजार रुग्ण झाले. तर मुंबई मध्ये सुमारे 1 लाख 28 हजार एवढे रुग्ण आहेत. पुण्याने ठाणे जिल्ह्याला यापूर्वीच मागे टाकले आहे. आता मुंबई ही मागे पडली आहे. त्यामुळे देशपातळीवर पुण्याकडे आता पुन्हा एकदा महाराष्ट्रातील हॉटस्पॉट म्हणून बघितले जाणार आहे. 

 राज्य आरोग्य विभाग अहवालानुसार 
 एकूण बाधित         अ‍ॅक्टिव्ह 
पुणे- 1,30,606       41,020 
मुंबई- 1,28,726     17,825 
ठाणे। 1,13,944     20,288
 

Web Title: Pune has overtaken Mumbai, despite being 5-6 times smaller than Mumbai, Pune No. 1 among the coronaries, MNS anil shidore

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.