शहरं
Join us  
Trending Stories
1
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
2
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
3
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
4
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
5
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
6
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
7
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
8
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
9
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
10
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
11
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
12
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
13
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
14
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
15
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
16
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
17
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
18
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
19
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
20
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
Daily Top 2Weekly Top 5

Pune GBS outbreak : जीबीएस रुग्णांमध्ये पुन्हा वाढ; ४७ रुग्ण आयसीयूत, तर २१ रुग्ण व्हेंटिलेटरवर

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 4, 2025 14:10 IST

गुईलेन बॅरी सिंड्रोम (जीबीएस) बाधितांची संख्या वाढत असल्यामुळे पुणे महापालिका ॲक्शन माेडवर

पुणे : गुईलेन बॅरे सिंड्रोम (जीबीएस) रुग्णांमध्ये दररोज वाढ होत असून, सोमवारी नव्याने पाच रुग्ण आढळले आहेत. यामुळे पुण्यातील जीबीएस संशयित रुग्णसंख्या १६३ झाली आहे. यापैकी ४७ रुग्णांना डिस्चार्ज मिळाला असून, ४७ रुग्ण आयसीयूमध्ये आणि २१ रुग्ण व्हेंटिलेटरवर आहेत.

बाधितांमधील ३२ रुग्ण पुणे महापालिका क्षेत्रातील, तर ८६ रुग्ण समाविष्ट गावातील आहेत. पिंपरी-चिंचवड महापालिका क्षेत्रातील १८, ग्रामीणमधील १९ आणि इतर जिल्ह्यातील ८ रुग्णांचा यात समावेश आहे. बाधित रुग्णसंख्येत २० ते २९ वयोगटातील सर्वाधिक ३५, तर ० ते ९ वयोगटातील २४ आणि ५० ते ५९ वयोगटातील २५ रुग्णांचा समावेश आहे.

पालिकेने केले ४३ हजार घरांचे सर्वेक्षण 

गुईलेन बॅरी सिंड्रोम (जीबीएस) बाधितांची संख्या वाढत असल्यामुळे पुणे महापालिका ॲक्शन माेडवर आली आहे. समाविष्ट गावांमध्ये सर्वेक्षण, विहिरीच्या पाण्यात क्लोरिनची मात्रा वाढविणे, सांडपाणी वाहिन्यांची दुरुस्ती, ऑक्सिजन व व्हेंटिलेटर खाटांची उपलब्धता, रुग्णांना मोफत उपचार, रुग्णांच्या नातेवाइकांचे समुपदेशन ते विविध प्रकारच्या उपाययोजना केल्या जात आहेत. महापालिकेकडून ४३ हजार घरांचे सर्वेक्षण पूर्ण केले आहे. गावांमध्ये २० हजार मेडिक्लोअरच्या बाटल्यांचे वाटप केले आहे. विशेषतः खासगी रुग्णालयांकडून रुग्णांची होणारी आर्थिक लूट थांबविण्यासाठी संबंधित रुग्णालयांवर वैद्यकीय अधिकाऱ्यांद्वारे लक्ष ठेवले जात आहे.

सर्वाधिक रुग्ण २० ते २९ वयोगटातील

पुण्यात आतापर्यंत १६८ जीबीएसचे रुग्ण सापडले आहेत. यामध्ये बरे होण्याचे प्रमाणही वाढत आहेत. परंतु जीबीएस झालेल्या एकूण रुग्णांमध्ये २० ते २९ वयोगटातील रुग्णांची संख्या जास्त म्हणजे संख्या ३५ आहे. यानंतर ५० ते ५९ वयोगटातील रुग्णांची संख्या २५ आहे.

टॅग्स :PuneपुणेMaharashtraमहाराष्ट्रpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडWaterपाणीHealthआरोग्यMuncipal Corporationनगर पालिका