Pune Ganpati Festival : “मोरया मोरया” चा जयघोष..! लाडक्या गणरायाला पुणेकरांचा भक्तीभावे निरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 6, 2025 16:38 IST2025-09-06T16:36:55+5:302025-09-06T16:38:10+5:30

मानाचा तिसरा गुरुजी तालीम मंडळाचा पुण्याचा राजा दाखल झाला.

pune Ganpati Festival pune residents bid a devout farewell to their beloved Ganesha | Pune Ganpati Festival : “मोरया मोरया” चा जयघोष..! लाडक्या गणरायाला पुणेकरांचा भक्तीभावे निरोप

Pune Ganpati Festival : “मोरया मोरया” चा जयघोष..! लाडक्या गणरायाला पुणेकरांचा भक्तीभावे निरोप

पुणे : पुण्याची वैभवशाली परंपरा असलेला गणेश विसर्जन सोहळा पाहण्यासाठी देश-विदेशातून लाखो भाविकांनी हजेरी लावली. भव्य आकर्षक रथांमधून मोठ्या थाटात निघालेला यंदाचा विसर्जन सोहळा लक्ष्मी रस्ता, टिळक रस्ता, कुमठेकर रस्ता, केळकर रस्त्यावरून पुढे सरकत भक्तिमय वातावरणात रंगत गेला आहे.

मिरवणुकीच्या सुरुवातीला तुतारी, नगारा वादन, बालशिवाजींचा देखावा, “मोरया मोरया” चा जयघोष, रमणबाग ढोल-ताशा पथक, झेंडेवाले, टाळ-ढोल वादन, डोक्यावर फेटा आणि अंगात लाल सदरा या सगळ्यांनी वातावरण दुमदुमून टाकले. परशुराम वाद्य पथक, कामायनी पथकाचे “झाडे जगवा” संदेश देणारे सादरीकरण, बँक ऑफ इंडियाची टीम, श्री जयंती गजानन मंडळाचा शिवजिजाऊंचा देखावा आणि पोवाडा, रुद्रगर्जना पथकाचे प्रात्यक्षिक, प्रभात बँड पथकाचे “जय महाराष्ट्र” गीत या सर्वांनी सोहळ्यात रंग भरला.कुमठेकर रस्त्यावर फटाक्यांची आतषबाजी झाली.

 “जय श्रीराम, सनातन धर्म की जय, गणपती बाप्पा मोरया” अशा घोषणा घुमल्या. मानाचा दुसरा तांबडी जोगेश्वरी मंडळ, ताल पथकाचे गांधी टोपी व पिवळा कुर्ता परिधान केलेले सादरीकरण, वराह अवताराचा देखावा, हत्तीवर विराजमान शिवरायाचा देखावा, तसेच शिवमुद्रा पथकाचे प्रात्यक्षिक यामुळे भाविकांची गर्दी उसळली.यानंतर मानाचा तिसरा गुरुजी तालीम मंडळाचा पुण्याचा राजा दाखल झाला. गर्जना पथकाचे प्रात्यक्षिक, अश्वराज बँडचे गुलाल उधळण, भक्तिमय गाणी, जय श्रीराम-जय गणेश घोषणांनी मिरवणूक दणाणली.

पोलिसांच्या समन्वयाने मिरवणुकीला गती मिळाली. नादब्रह्म पथकानेही सादरीकरण करून गुलाल उधळला.मानाचा चौथा तुळशीबाग गणपती मंडळ भव्य सजावटीसह दाखल झाला. नगारा वादन, स्वरूपवर्धिनी पथकाचे प्रात्यक्षिक, हलगीच्या तालावर अफजलखान वध, ब्रह्म-विष्णू-महेश यांचा देखावा, मलखांब सादरीकरण यामुळे प्रेक्षकांनी टाळ्यांचा कडकडाट केला. 

कृष्णावताराचा देखावा, गजलक्ष्मी वाद्य पथकाचे वादन, शिवमुद्रा पथकाचे प्रात्यक्षिक यामुळे भाविक मंत्रमुग्ध झाले.पालिका व पोलिस प्रशासनाच्या दक्षतेमुळे मिरवणूक शिस्तबद्ध पार पडत असून, नागरिक आणि भाविक उत्साहाने “गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या” या जयघोषात बाप्पांना निरोप देत आहेत.

Web Title: pune Ganpati Festival pune residents bid a devout farewell to their beloved Ganesha

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.