Pune Ganpati Festival :भाविकांना देखावे पाहण्यासाठी स्वारगेट ते सिव्हिल कोर्ट दर तीन मिनिटांला धावणार मेट्रो

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 27, 2025 12:29 IST2025-08-27T12:27:57+5:302025-08-27T12:29:58+5:30

- कसबा आणि मंडई मेट्रो स्थानकामुळे भाविकांना देखावे पाहण्यासाठी सुविधा

Pune Ganpati Festival Metro will run between Swargate and Civil Court in three minutes during Ganeshotsav - Kasba and Mandai metro stations will provide convenience for devotees to see the spectacle | Pune Ganpati Festival :भाविकांना देखावे पाहण्यासाठी स्वारगेट ते सिव्हिल कोर्ट दर तीन मिनिटांला धावणार मेट्रो

Pune Ganpati Festival :भाविकांना देखावे पाहण्यासाठी स्वारगेट ते सिव्हिल कोर्ट दर तीन मिनिटांला धावणार मेट्रो

पुणे : गणेशोत्सव काळात देखावे पाहण्यासाठी शहराच्या मध्य भागांत भाविकांची मोठी गर्दी होते. यामुळे भाविकांना ये-जा करण्यासाठी, तसेच गर्दीवर नियंत्रणासाठी महामेट्रोने गणेशोत्सवात स्वारगेट ते सिव्हिल कोर्ट यादरम्यान दर तीन मिनिटांला मेट्रो सोडण्याचे नियोजन केले आहे. त्यासाठी दोन दिवसांपासून चाचणी घेतली जात आहे. यामुळे मंडई, कसबा पेठ येथील गर्दी कमी होण्यास मदत होणार आहे, अशी माहिती महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक श्रावण हर्डीकर यांनी दिली.

पुण्यातील गणेशोत्सव जगप्रसिद्ध आहे. यामुळे देखावे पाहण्यासाठी राज्य, राज्याबाहेरील तसेच परदेशातील गणेशभक्त पुण्यात येतात. यंदा मध्य शहरातील कसबा आणि मंडई हे दोन मेट्रोस्थानक सुरू झाल्यामुळे भाविकांना मुख्य देखावे पाहण्यासाठी सोयीचे होणार आहे. गणेशोत्सवात रात्री उशिरापर्यंत सेवा देण्याचे नियोजन केले आहे. जिल्हा न्यायालय ते स्वारगेट मार्गावर मेट्रो सुरू असणार आहे. या मार्गावरील कसबा, मंडई, स्वारगेट ही मेट्रो स्थानके सुरू झाली आहे. ही स्थानके नागरिकांना थेट मानाच्या गणपतीच्या जवळपास आहे. शिवाय, मध्यवर्ती भागात गर्दी जास्त होते. त्यामुळे मेट्रोच्या फेऱ्या वाढविण्यात येणार आहेत. तसेच, मध्य वस्तीमधील मंडई, कसबा येथे गर्दी होऊ नये म्हणून नियोजन करण्यात आले आहे. मंडई येथे एका बाजूला प्रवेश आणि दुसऱ्या बाजूने बाहेर पडण्याची सोय करण्याचे नियोजन आहे.
 
कसबा स्टेशनला उतरा; मंडई स्टेशनपासून परतीचा प्रवास करा

गणपती बाप्पाचे दर्शन घेण्यासाठी व देखावे पाहण्यासाठी येणाऱ्या भाविकांनी कसबा मेट्रो स्टेशन येथे उतरावे. तेथून गणपती पाहण्यास जावे. परतीचा प्रवास मंडई मेट्रो स्टेशनपासून करावा. त्यामुळे एकाच मेट्रो स्टेशनवर गर्दी होणार नाही. तसेच, वनाझ ते रामवाडी मार्गिकेवरून प्रवास करणाऱ्यांनी पीएमपी मेट्रो स्टेशन येथे उतरून देखावे पाहण्यासाठी शहरात जावे, असे आवाहन महामेट्रोकडून करण्यात आले आहे.
 

पोलिसांसोबत बैठका सुरू

गर्दीवर नियोजनासाठी पोलिसांसोबत बैठका सुरू आहेत. आतापर्यंत तीन बैठका झाल्या असून, चर्चा झाल्यानंतर गर्दीचे नियोजन केले जाणार आहे. तसेच, इतरही मेट्रो स्टेशनवर गणपतीमध्ये गर्दी होण्याची शक्यता गृहित धरून योग्य नियोजन केले जात आहे. त्यासाठी मनुष्यबळदेखील वाढविण्यात येत आहे.
 

गणेशोत्सवात मेट्रोची विशेष वेळापत्रक

(दि. २७ ते २९ ऑगस्ट) - सकाळी ६ ते रात्री ११ पर्यंत
(दि. ३० ऑगस्ट ते दि. ५ सप्टेंबर) - सकाळी ६ ते रात्री २ पर्यंत
(अनंत चतुर्दशी दि. ०६ आणि ०७) - सकाळी ६ ते दुसऱ्या दिवशी रात्री ११ पर्यंत

 गणेशोत्सवात भाविकांनी देखावे पाहण्यासाठी कसबा स्टेशनला उतरून पुढे जावे. तर परतीचा प्रवास मंडई स्टेशनवरून करावे. शिवाय मध्य भागात होणारी गर्दी लक्षात घेऊन स्वारगेट ते सिव्हिल कोर्ट दरम्यान दर तीन मिनिटांनी मेट्रो सोडण्याचे नियोजन आहे. त्याची तयारी मेट्रो प्रशासनाकडून करण्यात आली आहे. याचा भाविकांना दर्शन घेण्यासाठी सोयीचे होणार आहे.   - श्रावण हर्डीकर, व्यवस्थापकीय संचालक, महामेट्रो 

Web Title: Pune Ganpati Festival Metro will run between Swargate and Civil Court in three minutes during Ganeshotsav - Kasba and Mandai metro stations will provide convenience for devotees to see the spectacle

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.