Pune Ganpati Festival : ऑस्ट्रेलियात ही गणेश विसर्जनाची धूम;मराठी कट्टा मंडळाचा गणेशोत्सव साजरा

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 7, 2025 18:45 IST2025-09-07T18:44:52+5:302025-09-07T18:45:03+5:30

- ऑस्ट्रेलियामधील सिडनी शहराच्या नैऋत्यच्या मिंटो गणपती मंदिरात हा गणेशोत्सव विसर्जन दणक्यात साजरा करण्यात आला आहे.

Pune Ganpati Festival Ganesh immersion is a big deal in Australia Marathi Katta Mandal celebrates Ganesh festival | Pune Ganpati Festival : ऑस्ट्रेलियात ही गणेश विसर्जनाची धूम;मराठी कट्टा मंडळाचा गणेशोत्सव साजरा

Pune Ganpati Festival : ऑस्ट्रेलियात ही गणेश विसर्जनाची धूम;मराठी कट्टा मंडळाचा गणेशोत्सव साजरा

चाकण : एकीकडे संपूर्ण महाराष्ट्रात गणेशोत्सवाची धूम सुरू असताना साता समुद्रापार ऑस्ट्रेलियामध्ये ही गणेशोत्सवाचा उत्साह दिसून आला.परदेशात स्थायिक झालेल्या किंवा कामानिमित्त असलेल्या मराठी माणसाने गणेशोत्सव साजरा केला आहे. ऑस्ट्रेलियामधील सिडनी शहराच्या नैऋत्यच्या मिंटो गणपती मंदिरात हा गणेशोत्सव विसर्जन दणक्यात साजरा करण्यात आला आहे.

ऑस्ट्रेलियाचा राजा म्हणून मराठी कट्टा मंडळी हा उत्सव साजरा करत आहेत.गणेशोत्सवाचे हे चोविसावे वर्ष आहे.येथील मराठी माणसाने एकत्र येऊन मराठी कट्टाची स्थापना २००२ मध्ये केली आहे.मराठी समुदायाची सेवा करण्याच्या उत्कट वचनबद्धतेसह ऑस्ट्रेलियातील सिडनीच्या नैऋत्येस स्थित मराठी कट्टा हे मंडळ मराठी सणाच्या निमित्ताने एकत्र येऊन विविध कार्यक्रम साजरे करतात.  

ऑस्ट्रेलियातील सिडनीच्या नैऋत्येस असलेल्या भागात मोठ्या संख्येने मराठी लोक राहातात.राजेश चामदूरकर,आनंद चौधरी विवेक खलाने,अमित विधव्यांस,नितु गानू,रवी शार्दूल यांच्यासह तब्बल दोन हजार लोकांनी एकत्र येऊन मराठी कट्टा मंडळाच्या माध्यमातून आपली संस्कृती जपली आहे.गणेशाचे आगमन झाल्यावर अकरा दिवस विविध सार्वजनिक सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते.

अनंतचतुर्थीला गणेश विसर्जन मिरवणूकीसाठी मराठमोळी वेशभूषा करत गणरायाची मिरवणूक काढण्यात आली. हातात भगवे झेंडे,डोक्याला फेटे,महिलांच्या नववारी साड्या,तर पुरूषांनी घातलेले सदरे यामुळे ऑस्ट्रेलियातील लोकांचेही या मिरवणुकीकडे लक्ष वेधले होते.मिरवणुकीत ढोल ताश्या बरोबर लेझिम पथकही होते.बाप्पाची देखणी आणि सुबक मुर्ती बसवण्यात आली आहे.

Web Title: Pune Ganpati Festival Ganesh immersion is a big deal in Australia Marathi Katta Mandal celebrates Ganesh festival

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.