Pune Ganpati Festival : पुढच्या वर्षी लवकर या! पुण्यातील मानाच्या पाचही गणपतींच्या विसर्जन मिरवणुकीस सुरुवात

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 6, 2025 13:12 IST2025-09-06T13:11:23+5:302025-09-06T13:12:18+5:30

- दरवर्षी लांबणारी मिरवणूक यंदा लवकर संपविण्याचा निर्धार पोलिसांनी केला आहे.

Pune Ganpati Festival Bappa come early next year Farewell to Ganesha today All five famous Ganeshas of Pune arrive at Belgaum Chowk | Pune Ganpati Festival : पुढच्या वर्षी लवकर या! पुण्यातील मानाच्या पाचही गणपतींच्या विसर्जन मिरवणुकीस सुरुवात

Pune Ganpati Festival : पुढच्या वर्षी लवकर या! पुण्यातील मानाच्या पाचही गणपतींच्या विसर्जन मिरवणुकीस सुरुवात

पुणे : मंगलमयी सूर अन् चैतन्यमय वातावरणात रंगलेला दहा दिवसांचा गणेशोत्सव आता अंतिम टप्प्यात आला आहे. यामुळे लाडक्या बाप्पांना मोठ्या भक्तिभावाने आणि थाटात निरोप देण्यासाठी तयारी सुरू करण्यात आली आहे.   गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या अशा जयघोषांचा उत्साह दाटून आला आहे. दरम्यान, पुण्यात मनाच्या पाचही गणपतीच्या विसर्जन मिरवणुकीला सुरुवात झाली आहे.

आज शनिवारी (दि. ६) ‘गणपती बाप्पा मोरया’चा जयघोष आणि ढोल-ताशांच्या गजरात मानाच्या पाच गणपतींसह प्रतिष्ठित ‘श्रीं’ची विसर्जन मिरवणूक आकर्षक रथातून काढण्यात येत आहे. . यंदा विसर्जन मिरवणुकीला सकाळी सुरुवात होणार झाली असून, पुण्यातील मानाचा पहिला कसबा गणपतीची आरती करून विसर्जन मिरवुकीला सुरुवात झाली.  पुण्यातील मानाचे गणपतीच्या विसर्जन मिरवुकीला सुरुवात झाली आहे.

 श्री कसबा गणपती मंडळ

श्री कसबा गणपती मंडळाच्या ‘श्रीं’ ची मिरवणूक पारंपरिक पद्धतीने सकाळी पालखीतून निघाली असून, राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार, उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील, केंद्रीय मंत्री मुरलधीर मोहोळ यांची उपस्थिती असणार होते. दोन ढोल-ताशा पथकांचा सहभाग, गणेशोत्सवाची माहिती देणारा विशेष रथ यांसह विविध सामाजिक संस्थांचा मिरवणुकीमध्ये सहभाग दिसून आला.  


श्री तांबडी जोगेश्वरी गणेशोत्सव मंडळ

मानाच्या दुसऱ्या श्री तांबडी जोगेश्वरी गणेशोत्सव मंडळाच्या ‘श्रीं’ची मिरवणूक दर वर्षीप्रमाणे यंदाही पारंपरिक पद्धतीने पालखीतून  विसर्जन मिरवुकीला सुरुवात झाली आहे.  अब्दागिरी, मानचिन्हासह श्री गणराय विराजमान असलेली चांदीची पालखी कार्यकर्ते स्वत: आपल्या खांद्यावरून वाहून मिरवणुकीत सहभागी झाले. नगरावादन आणि ढोल-ताशा पथकांचे वादन करण्यात आले.

 गुरुजी तालीम गणपती मंडळ

मानाचा तिसरा गुरुजी तालीमचा गणपती सकाळी ‘हर हर महादेव’ या फुलांनी सजविलेल्या रथावर विराजमान झाले. स्वप्नील सरपाले, सुभाष सरपाले यांनी हा रथ साकारला आहेत. नगारा वादन आणि ढोल-ताशा पथकांचे वादन  करण्यात आले.

तुळशीबाग महागणपतीची मयूर रथातून सांगता मिरवणूकीला सुरुवात

मानाचा चौथा श्री तुळशीबाग सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ ट्रस्टच्या १२५ व्या वर्षीच्या गणेशोत्सवाची सांगता वैभवशाली सांगता मिरवणुकी सुरुवात झाली. तुळशीबाग महागणपतीची मिरवणूक मयूर रथातून निघाला असून मयूर रथावर फुलांची आकर्षक सजावट करण्यात आली.  या रथामध्ये हायड्रोलिक पद्धतीचा वापर करण्यात आला आहे. रथाची उंची ३५ फूट इतकी असून हा रथ १६ फूट रुंद आणि २४ फूट लांब आहे. मंडळाच्या १२५ व्या वर्षानिमित्त महिला व परिसरातील व्यापारी मोठ्या संख्येने मिरवणुकीत सहभागी झाल्या आहे. मिरवणुकीच्या अग्रभागी लोणकर बंधू यांचा नगारा असून, ढोल-ताशा पथकेदेखील सहभागी झाले आहे.


 

‘कथकली मुखवट्याच्या’ रथात केसरीवाडा गणपती

मानाच्या पाचव्या केसरीवाडा गणेशोत्सवाच्या विसर्जन मिरवणुकीला आज (शनिवारी) सकाळी महात्मा फुले मंडईतील लोकमान्यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून सुरुवात झाली. मिरवणुकीत श्रीराम, शिवमुद्रा, स्वराज्य ट्रस्ट ढोल-ताशा पथकांचा समावेश आहे. बिडवे बंधूंचे नगारा वादन, इतिहासप्रेमी मंडळाचा छत्रपती शिवाजी महाराज समाधी जीर्णोद्धार हा देखावा  आहे. ‘कथकली मुखवट्याच्या’ रथात प्रथेप्रमाणे गणराय पालखीत विराजमान आहे.  विसर्जन मिरवणुकीत केसरीवाडा गणेशोत्सव प्रमुख डॉ. रोहित टिळक, ‘केसरी’च्या विश्वस्त-व्यवस्थापिका डॉ. गीताली टिळक, विश्वस्त डॉ. प्रणीत रोहित टिळक, रौनक रोहित टिळक तसेच ‘केसरी’चे अधिकारी, कर्मचारी उपस्थित आहे. ‘हरवलेला पोस्टमन’ ही स्वराज्य ट्रस्ट ढोल-ताशा पथकाची संकल्पना आहे.

Web Title: Pune Ganpati Festival Bappa come early next year Farewell to Ganesha today All five famous Ganeshas of Pune arrive at Belgaum Chowk

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.