'मिरवणुकीत डॉल्बी, डीजे नकोच'; कलावंत ढोल ताशा पथकाच्या कलाकारांची विशेष मोहीम

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 12, 2025 13:48 IST2025-09-12T13:44:28+5:302025-09-12T13:48:06+5:30

- पुण्यात डॉल्बी-डीजे विरोधात कलावंत ढोल ताशा पथकाची मोहीम

Pune Ganpati Festival a special campaign will be implemented by the artists of the Kalavant Dhol Tasha Troupe | 'मिरवणुकीत डॉल्बी, डीजे नकोच'; कलावंत ढोल ताशा पथकाच्या कलाकारांची विशेष मोहीम

'मिरवणुकीत डॉल्बी, डीजे नकोच'; कलावंत ढोल ताशा पथकाच्या कलाकारांची विशेष मोहीम

पुणे - सार्वजनिक उत्सवांच्या मिरवणुकांमध्ये वाढत्या डॉल्बी आणि साउंड सिस्टिम्सच्या वापरा विरोधात कलावंत ढोल ताशा पथकाच्या कलाकारांकडून विशेष मोहीम राबविण्यात येणार आहे. “डीजेवर बंदी घालावी” या मागणीसाठी रविवारी पुण्यात स्वाक्षरी मोहीम आयोजित करण्यात आली असून, या मोहिमेत अनेक मराठी कलाकार सहभागी होणार आहेत.  या मोहिमेतून गोळा करण्यात येणाऱ्या स्वाक्षऱ्या व निवेदन महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री यांच्याकडे सुपूर्द केले जाणार असल्याची माहिती अभिनेते सौरभ गोखले यांनी दिली.

निवेदनात प्रमुख मागण्या करण्यात आल्या आहे. धार्मिक व सांस्कृतिक उत्सवांतील मिरवणुका, महापुरुषांच्या जयंती-पुण्यतिथी निमित्त शोभायात्रांमध्ये डीजे/डॉल्बी व तत्सम मोठ्या ध्वनीप्रणालींना सक्त मनाई करावी. अशा आवाजामुळे स्थानिक रहिवाश्यांना होणारा त्रास, शारीरिक हानी (जसे की बहिरेपणा) तसेच वाहतूक कोंडीस आळा घालावा. मिरवणुकांमध्ये पारंपरिक वाद्य व कलाप्रकारांना प्रोत्साहन द्यावे.  ध्वनी प्रदूषण नियंत्रणासाठी स्वतंत्र नियमावली तयार करावी. या मागण्या करण्यात आल्या आहे. 



कलावंत ट्रस्टने नागरिकांना आवाहन केले आहे की, प्रत्यक्ष येऊन स्वाक्षरी करून किंवा डिजिटल पिटीशन साइन करून या मोहिमेला पाठिंबा द्यावा. डिजिटल पिटीशनसाठीची लिंक कार्यक्रमाच्या दिवशी उपलब्ध करून देण्यात येईल.  परंपरागत वाद्यांचा गजर आणि संस्कृतीचे जतन या उद्देशाने ही मोहीम राबवली जात असल्याचे कलावंतांनी स्पष्ट केले.   

Web Title: Pune Ganpati Festival a special campaign will be implemented by the artists of the Kalavant Dhol Tasha Troupe

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.