पुणे : मार्केटयार्डमध्ये लावलेल्या आगीत 2 टेम्पो व 8 दुचाकी जळून खाक

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 17, 2018 10:31 IST2018-03-17T10:27:32+5:302018-03-17T10:31:45+5:30

मार्कटयार्डमध्ये अज्ञातांनी दोन वेळा लावलेल्या आगीत 2 टेम्पो आणि 8 दुचाकी जळून खाक झाल्या आहेत.

Pune: A fire broke out in Marquardyard, 2 tempo and 8 bikes burnt | पुणे : मार्केटयार्डमध्ये लावलेल्या आगीत 2 टेम्पो व 8 दुचाकी जळून खाक

पुणे : मार्केटयार्डमध्ये लावलेल्या आगीत 2 टेम्पो व 8 दुचाकी जळून खाक

पुणे : मार्केटयार्डमध्ये अज्ञातांनी दोन वेळा लावलेल्या आगीत 2 टेम्पो आणि 8 दुचाकी जळून खाक झाल्या आहेत. हडपसर येथील शंकर महाराज मठ येथे लावलेल्या आगीत आणखी 2 टेम्पो जळून गेले.  मार्केटयार्डमध्ये शुक्रवारी रात्री उशिरा 12.15 वाजण्याच्या सुमारास गोल इमारत येथे आग लागल्याची माहिती अग्निशमन दलाला मिळाली. तेथे इमारतीजवळ पार्क केलेल्या एका टेम्पोला आग लावण्यात आली होती. सणाच्या दिवसात रोजगाराचे साधन असलेला टेम्पो जळून गेल्याचे पाहून टेम्पो मालकाला तेथेच रडू आले. 

त्यानंतर पहाटे 3 वाजता मार्केट यार्डातच आग लागल्याची माहिती समोर आली. दोन दुकानांमध्ये पार्क केलेल्या 8 दुचाकी व एका टेम्पोला कोणीतरी आग लावली होती. अग्निशमन दलाने ती तातडीने विझवली. या ठिकाणी कोणतेही वीजेचे साधन नाही अथवा आग लागेल असे ज्वलनशील पदार्थही नसल्यानं कोणीतरी जाणीवपूर्वक आग लावल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येत आहे. 

यानंतर शनिवारी सकाळी 7.30 वाजता हडपसर येथील शंकर महाराज मठासमोर असलेल्या 2 टेम्पोला आग लागली होती. आगीत दोन्ही टेम्पो जळून खाक झाले. याही आगीचे कारण अस्पष्ट आहे. पोलिसांनी तपास सुरू केला आहे.

Web Title: Pune: A fire broke out in Marquardyard, 2 tempo and 8 bikes burnt

टॅग्स :fireआग