pune: मनोरुग्णालयात जेवणाचे कंत्राट देतो म्हणत १० लाखांना गंडा, पाच जणांविरोधात गुन्हा दाखल
By नितीश गोवंडे | Updated: November 4, 2023 18:53 IST2023-11-04T18:53:12+5:302023-11-04T18:53:33+5:30
Pune Crime News: ठाणे मनोरूग्णालयात जेवणाचे कंत्राट मिळवून देण्याच्या आमिषाने दहा लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी येरवडा पोलिसांनी पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला.

pune: मनोरुग्णालयात जेवणाचे कंत्राट देतो म्हणत १० लाखांना गंडा, पाच जणांविरोधात गुन्हा दाखल
- नितीश गोवंडे
पुणे - ठाणे मनोरूग्णालयात जेवणाचे कंत्राट मिळवून देण्याच्या आमिषाने दहा लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी येरवडा पोलिसांनी पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला.
राजू एरम अंदाजे, दत्तात्रय कुलकर्णी, यशोदीप कुलकर्णी, भुवनेश कुलकर्णी आणि जनार्दन चांदणे अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी आकाश बाळासाहेब तुपेरे (४३, रा. संभाजीनगर, धनकवडी) यांनी येरवडा पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तुपेरे आणि त्यांच्या मित्राची आरोपींशी ओळख झाली होती. आरोपींनी त्यांना येरवडा येथील मनोरूग्णालय परिसरात भेटण्यास बोलवले. ठाणे मनोरूग्णालयत जेवणाचे कंत्राट मिळवून देण्याचे आमिष दोघांना दाखवले.
आरोपींनी त्यांना बनावट कागदपत्रे दाखवत त्यांच्याकडून दहा लाख रुपये उकळले. पैसे घेतल्यानंतर मात्र त्यांना कंत्राट मिळवून दिले नाही. याबाबत त्यांनी आरोपींकडे विचारणा केली असता आरोपींनी तुपेरे यांना उडवाउडवीची उत्तरे दिली. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्यांनी पोलिसांकडे तक्रार दिली. या प्रकरणाचा पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक शिवदास लहाने करत आहेत.