शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यानंतर भारताचा पाकवर कायदेशीर स्ट्राईक; पाकिस्तानची आज बैठक
2
आजचे राशीभविष्य, २४ एप्रिल २०२५: नोकरदारांना आजचा दिवस शुभ आहे
3
जम्मू-काश्मिरात अडकलेल्या पर्यटकांचे पहिले विमान आज मुंबईत येणार; ८३ जणांमध्ये कोणा-कोणाचा समावेश?
4
१५,००० जणांनी कॅन्सल केलं काश्मीरचे विमान तिकीट; पहलगाम हल्ल्यानंतर पर्यटनाचा बेत रद्द
5
Pahalgam Terror Attack: भारत झुकणार नाही, कुणालाही सोडणार नाही; गृहमंत्री अमित शाह यांचा इशारा
6
हादरलेल्या काश्मीरमध्ये आजही महाराष्ट्र, गुजरातचे २०,००० पर्यटक; हॉटेलमध्ये मुक्काम
7
धर्मादाय रुग्णालयांवर आता तपासणी पथकाचा वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश
8
आम्ही आमच्या देशात सुरक्षित आहोत का?; डाेंबिवलीकरांचा संंतप्त सवाल
9
अजूनही पर्यटकांची पहिली पसंती काश्मीरलाच; हल्ल्याचा परिणाम तात्पुरता, सर्व सुरळीत होण्याची आशा
10
‘जशास तसे’ व ‘लक्षात राहील’ असे उत्तर देणे; पाकिस्तानला धडा शिकवावा लागेलच, पण...
11
‘आपल्या’ इतकाच राग, तितकेच दु:ख ‘त्यांना’ही आहे; १९ वेळा दहशतवाद्यांनी मला उचलून नेले
12
स्वीडनमधील हे जोडपं देश सोडून पळालं, मात्र जाताना १५८ पिंप मानवी विष्ठा मागे ठेवले
13
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
14
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
15
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
16
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
17
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
18
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

पुणे निवडणूक निकाल २०१९ : इंदापूरमध्ये अटीतटीच्या लढतीत हर्षवर्धन पाटलांचा पराभव

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 24, 2019 15:49 IST

indapur vidhan sabha election result 2019 : विधानसभा निवडणुकीसाठी झालेल्या अटीतटीच्या सामन्यात विद्यमान आमदार दत्तात्रेय भरणे व भाजपचे उमेदवार हर्षवर्धन पाटील यांच्यात लढत झाली.

इंदापुर : तालुक्यात विधानसभा निवडणुकीसाठी झालेल्या अटीतटीच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार आमदार दत्तात्रेय भरणे यांनी सुमारे ३००० हजारांपेक्षा जास्त मतांनी विजयी झाले आहेत. त्यांनी माजी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील यांचा पुन्हा पराभव केला आहे. तालुक्यात विधानसभा निवडणुकीसाठी झालेल्या अटीतटीच्या सामन्यात विद्यमान आमदार दत्तात्रेय भरणे व भाजपचे उमेदवार हर्षवर्धन पाटील यांच्यात लढत झाली. यामध्ये सकाळी भिगवण,पळसदेव परिसरातुन पाटील यांना आघाडी मिळाली होती. मात्र नंतर भरणे यांनी इतर भागात आघाडी घेण्यास सुरुवात केली. १४ व्या फेरीअखेर भरणे यांनी सुमारे १४०००हजार मतांची आघाडी घेतली. त्यामुळे कार्यकर्त्यांनी जल्लोष सुरू केला मात्र  नंतरच्या  प्रत्येक फेरीत मताधिक्य कमी होत राहिले मात्र २४ व्या फेरीअखेर ३००० पेक्षा जास्त मताधिक्य कायम राखुन भरणे यांनी विजय मिळविला. टपाली मतदानातही भरणे यांनी २५१ मतांची आघाडी घेतली. २०१४ मध्येही भरणे यांनी पाटील यांचा पराभव केला होता. यावेळी मात्र पाटील यांनी भाजप प्रवेश केल्याने निवडणूक रंगणार अशी शक्यता वर्तवली जात होती. मात्र, विद्यमान आमदार  भरणे यांनी मताधिक्य घेण्यास सुरुवात करुन विजयाच्या दिशेने वाटचाल सुरु केली. याठिकाणी एकुण १५ उमेदवार रिंगणात होते. तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेस व भाजप यांनी ही लढत प्रतिष्ठित केली होती. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी याठिकाणी लक्ष घातले होते. मात्र भरणे यांनी जिल्हा परिषदेच्या अडीच वर्षांच्या कालावधीत व आमदार म्हणून गेली. पाच वर्षांत केलीली विकासकामे यामुळे सर्व सामान्य जनता पाठिशी उभी राहिल्याचे चित्र आहे. भरणे यांना राजकीय कारकीर्दीत ज्या राजकीय कार्यकर्त्यांनी साथ  दिली होती. त्यांनी भरणे यांची साथ सोडून पाटील यांना सहकार्य करण्याची भूमिका घेतली होती. त्यामुळे भरणे यांना संपूर्ण पणे एकाकी लढत द्यावी लागली होती. मात्र, संयम बाळगत भरणे यांनी सर्वसामान्य जनतेच्या बळावर विजय मिळविला आहे. दरम्यान एका ईव्हीएम मशीन मध्ये बिघाड झाल्याने अंतिम निकाल घोषित करण्यास विलंब झाला आहे. 

टॅग्स :indapur-acइंदापूरNCPराष्ट्रवादी काँग्रेसBJPभाजपाAjit Pawarअजित पवारMaharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019