शहरं
Join us  
Trending Stories
1
“२० देशांनी भारताच्या बाजूने मतदान केले, १२ किल्ले जागतिक वारसा स्थळ घोषित झाले”: CM फडणवीस
2
१८० प्रवाशांऐवजी केवळ १५५ जणांनाच घेऊन उडाले एअर इंडियाचे विमान! विमानतळावर गोंधळ,नेमके झाले काय?
3
"जयंत पाटलांच्या राजीनाम्याची बातमी खोडसाळपणा...", प्रदेशाध्यक्षपदावरुन जितेंद्र आव्हाड यांनी स्पष्टच सांगितलं
4
लव्ह जिहादवरील 'पुस्तका'द्वारे लोकांना भडकवायचा छांगूर बाबा, आणखी ४ सहकाऱ्यांचाही खुलासा; या जिल्ह्यांत सुरू होता धर्मांतराचा खेळ
5
ट्रम्प सरकारची नोकरदारांवरच कुऱ्हाड! १३०० कर्मचाऱ्यांना कामावरून काढणार, लवकरच पाठवणार नोटीस
6
"पैशांची एखादी बॅग देऊ...आजकल हमारा नाम बहुत चल रहा है"; शिरसाटांची मिश्कील टिप्पणी
7
राज ठाकरेंचा मुद्दा, आशिष शेलारांनी दिले उत्तर; आभार मानत म्हणाले, 'त्यांनी उपस्थित केलेल्या मुद्द्याबद्दल...'
8
“महायुतीच्या अपयशावर बोट ठेवणार, पक्षाची प्रतिष्ठा वाढवणार”; शशिकांत शिंदेंची पहिली प्रतिक्रिया
9
IPO पूर्वी Flipkart चं मोठं गिफ्ट, ७५०० पेक्षा अधिक कर्मचाऱ्यांना होणार फायदा
10
स्वीडिश अभिनेत्रीच्या प्रेमात पडला आशिष चंचलानी? मराठी सिनेमातही दिसली; डेटिंगच्या चर्चा
11
छांगूर बाबाने मालमत्तेत भरपूर पैसे गुंतवले; पण स्वत:च्या नावावर एकही जमीन ठेवली नाही
12
सकाळ, दुपार, रात्र... दिवसातून ३ वेळा पराठा खाल्ला तर काय होईल, आरोग्यावर कसा होतो परिणाम?
13
'माझा व्हिडीओ मॉर्फ करून बनवला,अब्रुनुकसानीची नोटीस पाठवणार'; संजय शिरसाटांचा इशारा
14
८ व्या वेतन आयोगाच्या शिफारसी केव्हापर्यंत लागू होणार, केंद्रीय कर्मचाऱ्यांना माहीत करुन घेणं गरजेचं
15
भलं करायच्या नादात, ट्रम्प कापताहेत आपल्याच लोकांचे खिसे; आकडेवारी पाहून डोक्यावर हात माराल
16
१२ किल्ल्यांचा युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत समावेश; शरद पवारांनी मानले मोदी सरकारचे आभार
17
Astrology: जोडीदार 'क्लिक' होत नाही अशी तरुणांची सबब; हा ग्रहांचा परिणाम समजावा का?
18
छत्तीसगडच्या सुकमामध्ये २३ नक्षलवाद्यांनी एकत्र आत्मसमर्पण केले, त्यांच्यावर १.१८ कोटी रुपयांचे होते बक्षीस
19
IND vs ENG 3rd Test: मोहम्मद सिराजनं सांगितलं त्याच्या आगळ्यावेगळ्या सेलिब्रेशनमागचं कारण!
20
लग्नाच्या रात्रीच नवरी करणार होती कांड, पण नवरदेव निघाला भलताच हुशार! मित्रांना घरी बोलावलं अन्... 

पुणे निवडणूक 2019 : मला 1 लाख 60 हजारच्या मताधिक्य मिळेल

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 21, 2019 12:02 IST

Pune Vidhan Sabha Election 2019 : काेथरुडच्या जागेसाठी विराेधक एकवटले

पुणे : कोथरूड मतदारसंघातल्या निवडणुक राज्यातील सर्वाधिक चर्चेची ठरली आहे. त्याचे कारण म्हणजे भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील हे इथून निवडणूक लढवत असून त्यांना घेरण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस महाआघाडीच्या वतीने मनसेचे उमेदवार किशोर यांना पाठिंबा दिला आहे. कोथरुडकरांवर बाहेरचा उमेदवार लादला गेला असल्याची टीका यावेळी विरोधकांनी केला. त्याला प्रत्युत्तर देत पाटलांनी मी पुणेकर कसा हे ही संदर्भासहित स्पष्ट केले. मात्र तरीही प्रचार सभांच्या काळात आरोप प्रत्यारोपाने गाजलेल्या या निवडणुकीत चंद्रकांत पाटलांनी मतदान केल्यावर १ लाख साठ हजार मताधिक्याने निवंडून येईल असा आत्मविश्वास भाजपाचे प्रदेशाध्यक्ष आणि कोथरूड मतसंघाचे महायुतीचे उमेदवार चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केला आहे.  पुण्यात त्यांनी मतदान केल्यानंतर संवाद साधला त्यावेळी ते बोलत होते. पाटील म्हणाले , ज्याचा शेवट गोड ते सर्व गोड. 2014 पासून भाजपाचा ट्रेंड आहे लोकांचा राजकारण्यांवरचा विश्वास वाढत चालला आहे. आजचा मतदारांचा उत्साह अवर्णनीय आहे. लोकांची देहबोली भाजपचे सरकार येईल अशी आहे.त्यामुळेच मला या निवडणुकीत 1 लाख 60 हजारच्या मताधिक्य मिळेल असा  विश्वास आहे. तसेच हवा बदलल्याचे फक्त शरद पवार यांना दिसत आहे. त्यांच्या मागच्यांना पण दिसत नाही.

काेथरुडच्या जागेसाठी विराेधक एकवटले ; काॅंग्रेस - राष्ट्रवादीने दिला मनसेला पाठींबाचंद्रकांत पाटील भाजपचे पहिल्या फळीतील नेते असून प्रदेशाध्यक्ष आहे. ते आतापर्यंत विधान परिषदेवरच निवडून येत होते. परंतु, जनतेतून निवडून आल्याशिवाय मंत्रिमंडळात 'नो एन्ट्री' या मोदी-शाह स्ट्रॅटर्जीमुळे चंद्रकांत पाटलांना विधानसभेच्या रिंगणात उतरावे लागत आहे. त्यानुसार त्यांनी कोथरूड मतदार संघाची निवड केली आहे.कोथरूड मतदार संघातून पाटील यांचे नाव निश्चित झाल्यानंतर मतदार संघातील लोकांनी विरोध दर्शविला होता. त्यानंतर १९८२ पासून १३ वर्षे विद्यार्थी परिषदेचा संघटनमंत्री असताना मी पुण्यात इतक्यावेळा गेलो आहे की, पुणे, कोथरुड मला जितके माहित आहे. तितके कोणालाच माहित नाही. दुसरी गोष्ट म्हणजे गेली बारा वर्षे मी पुणे पदवीधरचाच आमदार आहे. तसेच आमदार, महसूलमंत्री, पालकमंत्री आणि पक्षाचा अध्यक्ष म्हणून मी अनेकदा पुण्याला जातो. त्यामुळे पुणेकर मला परका समजणार नसल्याचे देखील चंद्रकांत पाटील यांनी सांगतिले होते. 

टॅग्स :Puneपुणेkothrudकोथरूडkothrud-acकोथरुडchandrakant patilचंद्रकांत पाटीलMNSमनसेNCPराष्ट्रवादी काँग्रेसMaharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019