पुणे : पूर्वीच्या भांडणावरुन जीवे मारण्याचा प्रयत्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 22, 2018 06:43 IST2018-01-22T06:43:32+5:302018-01-22T06:43:55+5:30

पूर्वी झालेल्या भांडण्याच्या कारणावरुन लाकडी बांबुने मारहाण करुन गंभीर जखमी करुन जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याचा गुन्हा फरासखाना पोलिसांनी दाखल केला आहे़ ही घटना बुधवार पेठेतील शेट्या मारुती मंदिरासमोरील जागेत शनिवारी दुपारी पावणेदोन वाजता घडली़

Pune: In an earlier attempt to kill lives | पुणे : पूर्वीच्या भांडणावरुन जीवे मारण्याचा प्रयत्न

पुणे : पूर्वीच्या भांडणावरुन जीवे मारण्याचा प्रयत्न

पुणे : पूर्वी झालेल्या भांडण्याच्या कारणावरुन लाकडी बांबुने मारहाण करुन गंभीर जखमी करुन जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याचा गुन्हा फरासखाना पोलिसांनी दाखल केला आहे़ ही घटना बुधवार पेठेतील शेट्या मारुती मंदिरासमोरील जागेत शनिवारी दुपारी पावणेदोन वाजता घडली़
वसंत बस्साप्पा कांबळे (वय ३७, रा़ भुतकर हौदयाजवळ, शुक्रवार पेठ) हे जखमी झाले असून पोलिसांनी संज्या ऊर्फ सुरेश यल्लाप्पा गोल्लर (वय ३२, रा़ बुधवार पेठ) याला अटक केली आहे़
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कांबळे आणि गोल्लर हे एकमेकासमोर राहतात़ एक महिन्यापूर्वी कांबळे यांनी गोल्लर यांच्या पत्नीला शिवीगाळ केली होती़ या कारणावरुन गोल्लर यांनी शनिवारी दुपारी कांबळे यांना लाकडी बांबुने मारहाण केली़ त्यात त्यांच्या मागील डोक्याची कवटीला मार लागला असून खांद्याचे हाड फ्रॅक्चर झाले आहे़ सहायक पोलीस निरीक्षक व्ही़ एऩ शिंदे अधिक तपास करीत आहेत़

Web Title: Pune: In an earlier attempt to kill lives