शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

Pune: फेरफार नोंदी घेण्यात पुणे जिल्हा राज्यात आघाडीवर

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 26, 2021 14:34 IST

जिल्हाधिकारी देखील स्वत: अनेक फेरफार अदालतीस उपस्थित राहिल्यानेच गेल्या वर्षभरात जिल्ह्यात तब्बल 10 लाख फेरफार नोंदी घेण्यात जिल्हा प्रशासनाला यश...

पुणे: शासनाच्या आदेशानुसार जिल्ह्यात दर महिन्याला चौथ्या बुधवारी नियमितपणे फेरफार अदालत आयोजित करणे यासाठी प्रांत अधिका-यांपासून, तहसिलदार, नायब तहसीलदार यांनी स्वतः लक्ष घालून गावांमध्ये उपस्थित राहण्याचे आदेश जिल्हाधिकारी डाॅ.राजेश देशमुख यांनी दिले. ऐवढेच नाही तर जिल्हाधिकारी देखील स्वत: अनेक फेरफार अदालतीस उपस्थित राहिल्यानेच गेल्या वर्षभरात जिल्ह्यात तब्बल 10 लाख फेरफार नोंदी घेण्यात जिल्हा प्रशासनाला यश आले. यामुळे फेरफार नोंदीत पुणे जिल्हा राज्यात आघाडीवर पोहोचलो असल्याची माहिती उपजिल्हाधिकारी संजय तेली यांनी दिली.

कोरोनामुळे गेल्या दीड दोन वर्षांत महसूल विभागाच्या दैनंदिन कामकाजावर खूपच परिणाम झाला. यामुळे प्रलंबित कामांची, फाईलची संख्या देखील वाढत गेली. यामुळेच तलाठी, सर्कल स्तरावरील प्रलंबित फेरफार नोंदींचा निपटारा करण्यासाठी शासनाने दर महिन्याला फेरफार अदालत घेण्यात आली. जिल्ह्यात घेण्यात येत असलेल्या फेरफार अदालतीला नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. या माध्यमातून जनतेच्या प्रलंबित, साध्या, वारस, तक्रारी, फेरफार नोंदी निर्गत करण्याचे काम गतवर्षभरापासून सुरू आहे. 24 नोव्हेंबर रोजी घेण्यात आलेल्या फेरफार अदालतीमध्ये एकाच दिवसात 3 हजार 361 नोंदी निकाली काढण्यात आल्या. तर आतापर्यंत जिल्ह्यात तब्बल 10 लाख नोंदी घेण्यात आल्या असून,  त्यापैकी 9 लाख 73 हजार नोंदी निकाली काढण्यात आल्या आहेत.

मंडळस्तरावर संपर्क अधिकाऱ्यांच्या नेमणूका फेरफार नोंदी निकाली काढण्याच्या कामात सुसूत्रता आणण्यासाठी ऑक्टोबर 2020 पासून प्रत्येक मंडळस्तरावर संपर्क अधिकाऱ्यांची नेमणूक करण्यात आली आहे. जिल्ह्यात 98 मंडळ मुख्यालयात झालेल्या फेरफार अदालतीत शेतकरी, खातेदार यांनी सहभागी होत चांगला प्रतिसाद दिला. 

10 लाख नोंदीचा टप्पा पारमागील एक वर्षात  3 लाख नोंदी घेत त्या निर्गत करण्यात आल्या आहेत. 2021 मध्ये फेरफार अदालतीला चांगला प्रतिसाद मिळाला असून 24 नोव्हेंबर रोजी 10 लाख नोंदी घेण्याचा महत्त्वाचा टप्पा पार करण्यात  आला. पुणे जिल्ह्यात संगणकीय प्रणालीमध्ये नोंदी भरण्यास प्रारंभ केल्यापासून एकूण 10 लाख 983 नोंदी झाल्या आहेत. या नोंदीपैकी 9 लाख 73 हजार नोंदी निर्गत असून  निर्गतीचे प्रमाण 97.14 टक्के आहे. नोंदी घेण्यात पुणे जिल्हा राज्यात दुसऱ्या क्रमांकावर आहे. 

तालुकानिहाय फेरफार नोंदी 24 नोव्हेंबर रोजीच्या फेरफार अदालतीद्वारे हवेली तालुक्यात 315, पुणे शहर 11, पिंपरी चिंचवड 84, शिरुर 270, आंबेगाव 163, जुन्नर 231, बारामती 776, इंदापूर 204, मावळ 241, मुळशी 134, भोर 111, वेल्हा 40, दौंड 194, पुरंदर 170 आणि खेड तालुक्यात 417 अशा एकूण 3 हजार 361 फेरफार नोंदी निर्गतीचे काम पूर्ण करण्यात आले.

टॅग्स :Puneपुणेpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडzpजिल्हा परिषदGovernmentसरकार