Corona Update: पुणे जिल्ह्यात सोमवारी १७ ओमयक्रॉनबाधित
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 3, 2022 21:08 IST2022-01-03T21:02:01+5:302022-01-03T21:08:02+5:30
जिल्ह्यातील नवीन आढळणाऱ्या कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याने चिंता वाढली आहे...

Corona Update: पुणे जिल्ह्यात सोमवारी १७ ओमयक्रॉनबाधित
पुणे : सोमवारी राज्यात ६८ ओमायक्रॉनबाधित रुग्णांची नोंद झाली. यापैकी ३४ राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्थेने आणि ३४ रुग्ण राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळा यांनी रिपोर्ट केले आहेत. पुणे शहरात १४, तर पुणे ग्रामीणमध्ये ३ ओमायक्रॉनबाधित रुग्ण आढळून आले आहेत.
आजपर्यंत राज्यात ५७८ ओमायक्रॉनबाधित रुग्ण आढळून आले आहेत. यापैकी २५९ रुग्णांना त्यांची आरटीपीसीआर चाचणी निगेटिव्ह आल्यानंतर रुग्णालयातून घरी सोडण्यात आहे. आतापर्यंत पुणे शहरात ६३, पिंपरी चिंचवडमध्ये ३६, तर पुणे ग्रामीणमध्ये २६ रुग्ण आढळून आले आहेत.
राज्यात १ नोव्हेंबर पासून आलेल्या आंतरराष्ट्रीय प्रवाशांचे देखील क्षेत्रिय पातळीवर सर्वेक्षण सुरु आहे. विमानतळ आणि क्षेत्रीय सर्वेक्षणातून आतापर्यंत २३७५ प्रयोगशाळा नमुने जनुकीय तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत. यापैकी १६६ नमुन्यांचा अहवाल अद्याप प्रलंबित आहे.