शहरं
Join us  
Trending Stories
1
शत्रूसाठी कोणतेच स्थान सुरक्षित नाही हे ‘ऑपरेशन सिंदूर’ने सिद्ध केले: पंतप्रधान नरेंद्र मोदी
2
राज ठाकरे 'मातोश्री'वर, पुन्हा मनोमिलनाची चर्चा; दोन्ही भावांची गळाभेट, वीस मिनिटे संवाद
3
वरळीतील  कार्यक्रमात अमित ठाकरे हजर; आदित्य ठाकरेंची पाठ, ज्युनियर ठाकरे एकत्र यायचा योग नाही
4
गोंधळानंतर संसदेत आजपासून पुन्हा चर्चा तापणार; ‘ऑपरेशन सिंदूर’वर सत्ताधारी-विरोधक आमने-सामने
5
महाराष्ट्रातील खासदारांना संसदरत्न; संसदीय कामकाज मंत्री किरीन रिजीजू यांच्या हस्ते पुरस्कार
6
पुण्यातील रेव्ह पार्टीवर कारवाई; एकनाथ खडसेंच्या जावयासह ७ अटकेत, दोन महिलांना रंगेहाथ पकडले
7
वीजप्रवाह उतरल्याच्या अफवेमुळे पळापळ; हरिद्वारच्या मनसा देवी मंदिरात चेंगराचेंगरी
8
११व्या शतकातील शिवमंदिरावरून उफाळला थायलंड-कंबोडिया संघर्ष; नेमके प्रकरण काय, वाद का वाढला?
9
थायलंड-कंबोडिया अखेर शस्त्रसंधीसाठी तयार; ट्रम्प यांची मध्यस्थी, सीमेवर अद्यापही तणाव कायम
10
अमेरिकेत बोइंग विमानाला आग, १७३ प्रवासी बालंबाल बचावले; लँडिंग गीअर बिघडले, उड्डाण रोखले
11
“रोख व्यवहार हा कायदेशीर वसूलपात्र कर्ज नाही”; केरळ हायकोर्टाचे निरीक्षण, प्रकरण काय?
12
खड्ड्यावरील दंडाला गणेश मंडळांचा विरोध; लहान मूर्तींनाही परवानगी देण्याची बैठकीत मागणी
13
IND vs ENG : टीम इंडियाने 'बॅझबॉल'वाल्यांची जिरवली.. संयम अन् धैर्याची लढाई जिंकली; सामना अनिर्णित
14
अहिल्यानगरमध्ये संविधान भवन उभारले जाणार, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची घोषणा!
15
रेल्वे रुळ ओलांडताना एक्स्प्रेसनं उडवलं, तिघांचा मृत्यू, माढा येथील घटना!
16
IND vs ENG : स्टोक्स हात मिळवायला आला; पण जड्डू-वॉशिंग्टन दोघांनी आम्ही नाही जा.. म्हणत ठोकली सेंच्युरी
17
Pune Rave Party: 'त्या' दोन रुममध्ये तीन दिवसांपासून रेव्ह पार्टी? कधीपासून बुक होत्या रुम, बिल बघितलं का?
18
मुंबई: बँकेकडून आलेल्या महिलेला मागून धरलं, मानेवर चुंबन घेतलं अन् 'नको तिथे' हात...
19
पाकिस्तानमध्ये बस दरीत कोसळून नऊ जण ठार, दोन लहान बाळांचाही समावेश, ३०हून अधिक जखमी
20
Thane Crime: पालन पोषणाचा खर्च परवडेना, पोटच्या तिन्ही मुलींना पाजलं विष, आईला अटक!

Corona Vaccination: पुण्यालाच कोव्हिशिल्ड मिळेना! कोव्हॅक्सिन लस मिळाल्याने महापालिकेसमोर मोठा पेच

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 15, 2021 13:58 IST

Corona Vaccination in Pune: अनेक ठिकाणी लसीकरण रद्द. नागरिकांना परत पाठवण्याची वेळ. तर १,३४,००० नागरिकांचे दुसऱ्या टप्प्यातील लसीकरण कसे करायचे महापालिकेसमोर पेच.

पुणे महापालिकेमध्ये कोरोना लसीकरणावरुन (Corona Vaccination) पुन्हा गोंधळ निर्माण झाला आहे. महापालिकेकडचा कोव्हिशिल्डचा (Covishield) साठा संपल्याने दुसऱ्या टप्प्याचे लसीकरण थांबले आहे. यामुळे पहिल्या टप्प्यातल्या लसीकरणासाठी आलेल्या नागरिकांना अनेक केंद्रांवरून माघारी पाठविण्याची वेळ पालिका प्रशासनावर आली आहे. (Covishield vaccine Shorteg in Pune. 2nd dose Vaccination stopped.)

महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी कोव्हिशिल्डची लस दुसऱ्या डोससाठी राखीव ठेवल्याचे सांगत पहिला डोस घेतलेल्यांना कोरोनाचे लसीकरण सुरु करण्याचे आदेश दिल्याचे सांगितले. ज्या कंपनीच्या लसीचा पहिला डोस घेतला त्यांना दुसरा डोसही त्याच लसीचा द्यावा लागणार आहे. मात्र, पालिकेला सीरमच्या कोव्हिशिल्डचा पुरवठाच झालेला नाही, यामुळे ही स्थिती निर्माण झाली आहे. 

पुणे महापालिकेकडे सुरुवातीला कोव्हीडशिल्डचा साठा देण्यात आला होता. पहिल्या टप्प्यात लसीकरण करायला आलेल्या नागरिकांना ही लस देण्यात आली होती. मात्र, हा साठा संपल्यानंतर आता महापालिकेला पन्नास हजार कोव्हॅक्सिन लसी पुरवण्यात आल्या आहेत. यामुळे पालिकेसमोर आधी पहिला डोस घेतलेल्यांना दुसरा डोस कसा द्यायचा, असा प्रश्न निर्माण झाला आहे. 

रुग्णालयांना नव्याने कोव्हॅक्सीनसाठी वेबसाईटवरची नोंदणी प्रक्रिया करायची असल्याने आज याचा परिणाम दिसून आला आहे.  अनेक ठिकाणी गोंधळ झालेला पहायला मिळाला. अनेक रुग्णालयांनी लसीकरण थांबवले. तर काही रुग्णालयांत १०० नागरिकांनाच थांबायला सांगत इतरांना माघारी पाठवून देण्यात आले आहे. 

दुसऱ्या टप्प्यातील लसीकरण ठप्प

एकीकडे हा पहिल्या डोसचा गोंधळ सुरु असतानाच कोव्हिशिल्डचे कमी डोस शिल्लक असल्याने दुसऱ्या टप्प्यातील लसीकरण देखील ठप्प झाले आहे. जवळपास १ लाख ३४ हजार लोकांचे दुसऱ्या टप्प्यातील लसीकरण थांबलेले असताना लस संपल्याने लसीकरण पुर्ण होण्यासाठी वाट पाहण्याची वेळ या लोकांवर आली आहे. 

दरम्यान याविषयी लोकमतशी बोलताना महापालिकेच्या आरोग्य विभागाचे प्रमुख डॉ. आशिष भारती म्हणाले “ कोव्हिशिल्डचा शिल्लक साठा हा पुर्णपणे दुसऱ्या टप्प्यातल्या लसीकरणासाठी वापरावा. तर नवीन लसीकरणासाठी कोव्हॅक्सिन द्यावे, असे आदेश रुग्णालयांना दिले आहेत. तसेच कुठेही लसीकरण थांबु नये यासाठी प्रयत्न सुरु आहेत. नवीन अभ्यासानुसार दुसऱ्या टप्प्यातील लसीकरण हे ६ ते ८ आठवड्यांनी केल्यास काहीच अडचण येत नाही.”

टॅग्स :Corona vaccineकोरोनाची लसPune Municipal Corporationपुणे महानगरपालिकाCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस