शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

कोल फायर अंगावर पडल्याच्या रागातून टोळक्याकडून तरुणाला मारहाण; चौघांविरुद्ध गुन्हा दाखल

By नम्रता फडणीस | Updated: March 18, 2025 20:10 IST

या घटनेननंतर जाब विचारल्याने या गुडांनी तरुणाच्या वडिलांनाही मारहाण केल्याचा प्रकार घडला आहे.

पुणे : शिवजंयतीनिमित्त सिंहगडावरुन ज्योत आणण्याकरीता कोल फायर उडवत जाताना रस्त्याच्या कडेला थांबलेल्या टोळक्याच्या अंगावर पडल्याने टोळक्याने तरुणाला लाकडी बांबूने मारहाण केली. मात्र या घटनेननंतर जाब विचारल्याने या गुडांनी तरुणाच्या वडिलांनाही मारहाण केल्याचा प्रकार घडला आहे. कर्वेनगर येथील विकास चौकात १७ मार्च रोजी मध्यरात्री सव्वाबारा वाजता हा प्रकार घडला.याबाबत तेजस अंकुश राजे (वय २२, रा. कर्वेनगर) यांनी वारजे माळवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरुन पोलिसांनी अक्षय दिल्लीवाला, ओमकार निम्हण (दोघे रा. कर्वेनगर) व त्यांच्या दोन मित्रांवर गुन्हा दाखल केला आहे. अक्षय दिल्लीवाला याच्यावर पूर्वीही गुन्हे दाखल झाले आहेत.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे त्यांच्या कॉलनीतील मित्रांसोबत दरवर्षी तिथीप्रमाणे शिवजयंती निमित्त ज्योत आणण्याकरिता सिंहगड येथे दि. १७ मार्च रोजी मध्यरात्री हे सर्व मित्र मोटारसायकलवरुन निघाले होते. फिर्यादी हे दुचाकीस्वार मित्राच्या मागे बसून कोलफायर उडवत चालले होते. वाटेत सुवर्ण बाल तरुण मित्र मंडळाजवळ त्यांच्या कॉलनीत राहणारे अक्षय दिल्लीवाला, ओमकार निम्हण व त्यांचे दोन मित्र थांबले होते. त्यांच्या अंगावर कोलफायर उडाले. तरीही त्याकडे लक्ष न देता ते सर्व पुढे निघून गेल्याने पाठीमागून अक्षय दिल्लीवाला व त्याचे तिघे साथीदार आले. त्यांनी फिर्यादीला हातातील बांबुने मारण्यास सुरुवात केली.सोबत असलेल्या ओमकार निम्हण व दोन साथीदारांनी हाताने मारहाण केली. फिर्यादी सोबत असलेल्या मित्रांनी भांडणे सोडविली. फिर्यादीच्या वडिलांना कळल्यावर घटनास्थळी गेल्यावर् त्यांनी आरोपीला जाब विचारला असता त्यांनी फिर्यादीच्या वडिलांनाही शिवीगाळ करुन हाताने मारहाण केली. पोलीस हवालदार भंडलकर तपास करीत आहेत.

टॅग्स :Puneपुणेpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडPoliceपोलिसArrestअटकMaharashtraमहाराष्ट्र