Pune Crime: पुण्यातील गुन्हेगारी दिवसेंदिवस वाढत आहे. गेल्या काही काळापासून पुण्यात कोयत्या गँगची प्रचंड दहशत पसरली आहे. सातत्याने पुण्यातून कोयता/तलवारीने हल्ला केल्याच्या घटना समोर येतात. आता अशाच प्रकारची घटना रामवाडी परिसरात असणाऱ्या आयटी पार्कसमोर घडली आहे. दुचाकीवर बसलेल्या तरुणावर दोन तरुणांनी तलवारीने हल्ला केला, ज्यात तो तरुण गंभीर जखमी झाला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना पहाटे तीन वाजता घडली. एक तरुण आयटी पार्कच्या गेटसमोर दुचाकीवर उभा होता. यादरम्यान, पाठीमागून दोन तरुण आले आणि त्या तरुणाशी वाद घालण्यास सुरुवात केली. यावेळी एका तरुणाने अचानक त्या तरुणावर तलवारीने हल्ला केला. ही संपूर्ण घटना कंपनीच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली. या व्हिडिओत स्पष्टपणे दिसत आहे की, दुचाकीवरील तरुणाच्या हातावर आणि डोक्यात तलवारीचे वार करण्यात आले. या घटनेमुळे परिसरात दहशतीचे वातावरण आहे.