Pune Crime: गावठी पिस्तूल, जिवंत काडतूस बाळगणारा खरपुडीतील तरुण गजाआड
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 22, 2023 11:39 IST2023-09-22T11:39:08+5:302023-09-22T11:39:49+5:30
संबंधित आरोपीकडून पोलिस आणखी माहिती घेत असून तपास करीत आहेत...

Pune Crime: गावठी पिस्तूल, जिवंत काडतूस बाळगणारा खरपुडीतील तरुण गजाआड
राजगुरुनगर (पुणे) : अवैधरित्या गावठी पिस्तुल जवळ बाळगणाऱ्या खरपुडीतील एका तरुणाला पोलिसांनी अटक केली. आरोपींकडून एक पिस्तुल आणि काडतुसे जप्त केली आहेत. दुर्गेश बाळासाहेब गाडे (वय २३ रा. खरपुडी खुर्द, ता. खेड ) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव असून खेड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
खेड पोलीस ठाण्याच्या हद्दीत गुन्हे शाखा ग्रामीण तपास पथकाला माहिती मिळाली होती. त्यानुसार सापळा रचून (दि. २१ )रोजी रात्री ९ वाजण्याच्या सुमारास शिरोली खरपुडी फाटा येथे दुर्गेश बाळासाहेब गाडे यांची झडती घेतली. त्यावेळी एक गावठी पिस्टल व एक जिवंत काडतुस असे बेकायदेशीररित्या विनापरवाना मिळून आले.
संबंधित आरोपीकडून पोलिस आणखी माहिती घेत असून तपास करीत आहेत. उपविभागीय पोलिस अधिकारी सुदर्शन पाटील पोलीस निरीक्षक राजकुमार केंद्रे यांनी तपासाबाबत सूचना केल्या आहेत. पिस्तूलाबाबत ज्या नागरिकांना माहिती असेल त्यांनी पोलिसांना ही माहिती द्यावी, त्यांची नावे गोपनीय ठेवण्यात येतील, असे पोलीस उपनिरीक्षक सागर खबाले यांनी सांगितले.