भिगवण (ता. दौंड) - भिगवण परिसरात मंगळवारी (दि.१७) दुपारी सुमारे चारच्या सुमारास धक्कादायक अपहरणाची घटना घडली. आईसोबत दुचाकीवरून जात असताना दोन युवकांनी आई व भावाच्या डोळ्यांत मिरचीपूड टाकून २१ वर्षीय तरुणीचे अपहरण केल्याची माहिती समोर आली आहे.'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर' कोण?... क्लिक करून आपलं मत नोंदवा!या प्रकरणी दोन सख्या भावांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपींची नावे जाहीर हारून शेख व आयान हारून शेख (रा. शेख वस्ती, स्वामी चिंचोली, ता. दौंड, जि. पुणे) अशी आहेत. गणेश बिरादार, अप्पर पोलीस अधीक्षक यांनी पत्रकार परिषदेत माहिती देत आरोपींच्या शोधासाठी विशेष पथके रवाना केल्याचे सांगितले. लग्नाच्या पाच दिवस आधी अपहरणअपहरण झालेल्या तरुणीचे पाच दिवसांवर लग्न ठरले होते. आरोपी व तरुणी एकाच वस्तीतील असल्याने अपहरणामागील हेतू स्पष्ट झालेला नाही. भिगवण पोलीस स्टेशन कडून सखोल तपास सुरू असून परिसरात कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे.रास्ता रोको आंदोलन, गावात तणावघटनेनंतर संतप्त नागरिकांनी मंगळवारी रात्री सुमारे १० वाजता पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्ग वर काही काळ रास्ता रोको आंदोलन केले. दरम्यान, हिंदू राष्ट्र संघटना व स्थानिक युवकांनी पोलिस ठाण्यात गर्दी केल्याने वातावरण तणावपूर्ण बनले. बुधवारी (दि.१८) भिगवण बंदची हाक देण्यात आली आहे.
Web Summary : A 21-year-old woman was kidnapped in Bhigwan before her wedding. Two brothers are accused. Protests erupted, and a bandh has been called. Police are investigating.
Web Summary : भिगवन में शादी से पहले 21 वर्षीय युवती का अपहरण कर लिया गया। दो भाइयों पर आरोप है। विरोध प्रदर्शन शुरू हो गया है, और बंद का आह्वान किया गया है। पुलिस जांच कर रही है।