शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

वडगाव आमच्या भाईचं..! लघुशंका करणाऱ्या तरुणाला हटकल्याने धमकी देत दाम्पत्यावर केला कोयत्याने हल्ला

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 11, 2025 12:29 IST

आम्ही ए डी भाईची मुले आहोत. मला अडवणार काय, आज तुझी विकेटच टाकतो, असे बोलून पतीच्या डोक्यात कोयत्याने वार केला

पुणे -धायरी भागात किरकोळ कारणावरून तिघा तरुणांनी पती-पत्नीवर कोयत्याने हल्ला करत जीवघेणा मारहाण केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. सार्वजनिक ठिकाणी लघुशंका करणाऱ्या तरुणाला हटकल्याने संतप्त झालेल्या हल्लेखोरांनी महिलेच्या डोक्यात कोयत्याने वार केला आणि पतीला ठार मारण्याचा प्रयत्न केला.ही घटना सिंहगड रस्ता परिसरातील हिंगणे खुर्द, महादेवनगर येथे शुक्रवारी रात्री घडली. ३७ वर्षीय महिलेने सिंहगड रस्ता पोलीस ठाण्यात तक्रार दिली असून, पोलीस अधिक तपास करत आहेत.नेमकं काय घडलेतक्रारदार महिला आणि तिचे पती शुक्रवारी संध्याकाळी कामावरून घरी परतत असताना सिंहगड रस्ता क्षेत्रीय कार्यालयासमोर कट्ट्यावर बसले होते. त्याचवेळी दुचाकीवरून तिघे तरुण आले आणि त्यातील एक जण कट्ट्याच्या जवळच उभा राहून लघुशंका करू लागला.  महिलेच्या पतीने त्या तरुणाला समज दिली, यावरून वाद सुरू झाला. हल्लेखोरांनी पतीला पकडून आम्ही येथेच लघवी करणार, आम्ही ए डी भाईची मुले आहोत. मला अडवणार काय, आज तुझी विकेटच टाकतो, वडगाव आमच्या भाईचं आहे, आम्ही येथेच लघवी करणार, कोण आम्हाला अडवतो?" असे धमकावले आणि शिवीगाळ सुरू केली. त्यानंतर एका हल्लेखोराने महिलेच्या डोक्यात कोयत्याने जोरदार वार केला, तर दुसऱ्याने तिच्या पतीच्या डोक्यावर हल्ला करत ठार मारण्याचा प्रयत्न केला. याबाबत सिंहगड रस्ता परिसरातील हिंगणे खुर्द येथील महादेवनगर येथे राहणार्‍या ३७ वर्षाच्या महिलेने सिंहगड रस्ता पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.पोलिसांची तत्परता, आरोपींचा शोध सुरूहल्ल्यामुळे परिसरात गोंधळ उडाला आणि नागरिकांची गर्दी पाहून हल्लेखोर कोयते हवेत फिरवत पळून गेले. घटनेची माहिती मिळताच पोलीस उपायुक्त निखिल पिंगळे, संभाजी कदम, सहायक पोलीस आयुक्त अजय परमार, वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिलीप दाईगडे आणि अन्य अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट दिली.  सिंहगड रस्ता पोलीस ठाण्याच्या सहायक पोलीस निरीक्षक वैशाली भोसले या प्रकरणाचा अधिक तपास करत असून, आरोपींच्या मुसक्या आवळण्यासाठी पोलिसांचे पथक रवाना झाले आहे. या प्रकारामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

टॅग्स :PuneपुणेPune Crimeपुणे क्राईम बातम्याPoliceपोलिसCrime Newsगुन्हेगारीMaharashtraमहाराष्ट्रpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड