शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
3
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
4
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
5
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
6
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
7
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
8
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
9
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
10
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
11
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
12
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
13
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
14
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
15
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
16
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
17
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
18
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
19
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
20
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
Daily Top 2Weekly Top 5

Pune Crime : सिंहगड रस्त्यावर थरार…! रुमाल बांधून आलेल्या चौघांचा तरुणावर वार

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 21, 2026 19:23 IST

- दोन दुचाकींवरून आलेल्या चार तरुणांनी तोंडाला रुमाल बांधून अचानक त्याच्यावर हल्ला चढवला.

धायरी (पुणे) :पुणे शहरातील सिंहगड रस्ता परिसर पुन्हा एकदा गुन्हेगारी घटनेमुळे हादरला आहे. माणिकबाग भागात शनिवारी सायंकाळी १७ वर्षीय अल्पवयीन मुलावर चार अज्ञात हल्लेखोरांनी धारदार शस्त्राने जीवघेणा हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली.मिळालेल्या माहितीनुसार, सायंकाळी साडेचार ते पाचच्या दरम्यान माणिकबाग परिसरातील बर्गर किंग दुकानासमोर हा तरुण उभा होता. त्याच वेळी दोन दुचाकींवरून आलेल्या चार तरुणांनी तोंडाला रुमाल बांधून अचानक त्याच्यावर हल्ला चढवला.हल्लेखोरांनी काही कळण्याच्या आत धारदार शस्त्राने वार करत मुलाला रक्ताच्या थारोळ्यात सोडले आणि घटनास्थळावरून पसार झाले. या प्रकारामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले. घटनेची माहिती मिळताच सिंहगड रस्ता पोलीस ठाणे पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. जखमी मुलाला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्याची प्रकृती गंभीर असल्याचे सांगण्यात येत आहे.या प्रकरणी सिंहगड रस्ता पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून, वरिष्ठ पोलीस अधिकारी परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत.पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज जप्त केले असून आरोपींचा शोध सुरू आहे. हल्ल्याचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. भरवस्तीत झालेल्या या घटनेमुळे परिसरातील सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. सिंहगड रस्ता परिसर हा कायम वर्दळीचा असल्याने दिवसाढवळ्या झालेल्या या हल्ल्याने नागरिकांमध्ये दहशत पसरली आहे. गुन्हेगारांना लवकर अटक करण्याची मागणी स्थानिकांकडून होत आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Pune: Masked assailants attack youth on Sinhagad Road, creating terror.

Web Summary : A 17-year-old was brutally attacked near Manikbag, Pune, by four masked men wielding sharp weapons. The victim is hospitalized in critical condition. Police are investigating the broad daylight assault, reviewing CCTV footage, and seeking the perpetrators as residents demand increased security.
टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडCrime Newsगुन्हेगारीPuneपुणेPune Crimeपुणे क्राईम बातम्याMaharashtraमहाराष्ट्र