आळे फाटा : बोरी बुद्रुक (ता. जुन्नर) येथील कोरडे मळ्यात शनिवारी (दि. २१) मध्यरात्री दोन वाजण्याच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी घर फोडून जबरी चोरी केल्याची घटना घडली. चोरट्यांनी घरातील कुटुंबीयांना कोयत्याचा धाक दाखवत सुमारे १५ तोळे सोन्याचे व १० तोळे चांदीचे दागिने लंपास केले.राजेंद्र सीताराम कोरडे हे पत्नी हिरा, मुलगा नितीन, सून धनश्री व मुलगी दीपाली यांच्यासह शेतातील घरात वास्तव्यास आहेत. मध्यरात्री दोनच्या सुमारास चोरट्यांनी घराच्या दरवाजावर मोठा दगड टाकून दरवाजा फोडला.
दरवाजा तोडल्याचा आवाज आल्याने कुटुंबीय जागे झाले असता, समोर चोरटे दिसल्याने त्यांनी आरडाओरडा करण्याचा प्रयत्न केला. यावेळी चोरट्यांनी राजेंद्र कोरडे यांच्या हातावर काठीने मारहाण केली व कोयत्याचा धाक दाखवत सर्वांना दमदाटी केली. “दागिने व पैसे कुठे आहेत ते सांगा, अन्यथा मारहाण करू," अशी धमकी देत कुटुंबीयांना एका खोलीत बसविण्यात आले.
त्यानंतर चोरट्यांनी कपाटाचे लॉकर तोडून त्यातील १५ तोळे सोन्याचे तसेच १० तोळे चांदीचे दागिने चोरून नेले. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले असून, पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.
Web Summary : In Bori Budruk, masked robbers threatened a family with a sickle, stealing 15 tolas of gold and 10 tolas of silver. Police are investigating.
Web Summary : बोरी बुद्रुक में, नकाबपोश लुटेरों ने एक परिवार को धमकाया और 15 तोला सोना और 10 तोला चांदी चुरा ली। पुलिस जांच कर रही है।