पुणे : तरुणीशी मैत्री करून लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर लैंगिक अत्याचार केले. तिला फायनान्सकडून कर्ज काढायला लावून त्याचे हप्ते न भरताच प्रियकर पसार झाल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी २६ वर्षीय तरुणीने विश्रांतवाडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरून पोलिसांनी मनप्रीत सिंग कॅथ ऊर्फ करण (३५, रा. सप्तर्षी टॉवर, जनकल्याण नगर रोड, मालाड वेस्ट, मुंबई) याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार जून २०२५ पासून आतापर्यंत घडला.
मनप्रीतसिंग याने फिर्यादी यांच्याशी मैत्री करून त्यांना प्रेमाच्या जाळ्यात ओढले. लग्नाचे आमिष दाखवून त्यांच्याशी वेळोवेळी शारीरिक संबंध केले. वेगवेगळी कारणे सांगून त्यांना तू तुझ्या नावाने फायनान्सकडून कर्ज घेऊन मला दे, मी कर्जाचे हप्ते भरतो, असे सांगून त्यांना विविध फायनान्स ॲपवरून एकूण २ लाख ७० हजार ५०० रुपयांचे कर्ज काढायला लावून ते स्वत:च्या वापरासाठी घेतले. या कर्जाचे हप्ते भरले नाही. फिर्यादी यांचा ७५ हजार रुपयांचा मोबाइल दोन तासासाठी पाहिजे, असे सांगून त्यांच्याकडून घेऊन तो पळून गेला. मनप्रीतसिंग याच्याशी संपर्क होत नसल्याने आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यावर तरुणीने विश्रांतवाडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक पाडेकर करत आहेत.
Web Summary : A Pune woman was cheated after her lover took loans in her name, promising repayment. He then absconded with the money and her phone. Police have registered a case against him.
Web Summary : पुणे में एक महिला के प्रेमी ने कर्ज चुकाने का वादा करके उसके नाम पर लोन लिया और फिर पैसे और फोन लेकर फरार हो गया। पुलिस ने मामला दर्ज कर लिया है।