शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
3
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
4
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
5
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
6
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
9
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
10
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
11
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
12
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
13
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
14
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
15
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
16
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
17
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
18
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
19
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
20
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
Daily Top 2Weekly Top 5

मंगला चित्रपटगृहाजवळील खून प्रकरणातील पंडित गँगचा म्होरक्या गजाआड; दोन वर्षांपासून देत होता गुंगारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 16, 2025 13:19 IST

- दोन पिस्तूल, चार जिवंत काडतुसे जप्त

पुणे : पंडित गँगचा म्होरक्या सूर्यकांत ऊर्फ पंडित ऊर्फ पिंटू ऊर्फ भाऊ दशरथ कांबळे (२९, रा. ताडिवाला रोड, खड्डा झोपडपट्टी) याला शिवाजीनगर पोलिसांनीअटक केली आहे. त्याच्याकडून दोन पिस्तूले, चार जिवंत काडतुसे जप्त केली आहेत. खून आणि मोक्काच्या गुन्ह्यात दोन वर्षांपासून तो पोलिसांना गुंगारा देत होता.सूर्यकांत उर्फ पंडित याने शाळेत असताना १३ व्या वर्षी साथीदाराचा खून केला. त्याच्या मुंडक्यासोबत फुटबॉल खेळला. दोन वर्षांपूर्वी मंगला चित्रपटगृहाबाहेर नितीन म्हस्के याचा खून केल्यानंतर तो फरार झाला होता, अशी माहिती पोलिस उपायुक्त संदीपसिंग गिल यांनी पत्रकार परिषदेत दिली.गिल म्हणाले की, पंडित कांबळे याच्या टोळीची ताडिवाला रोड व दांडेकर पूल परिसरात दहशत आहे. पूर्व वैमनस्यातून या टोळीने १५ ऑगस्ट २०२३ च्या रात्री मंगला चित्रपटगृहाच्या मागे नितीन मोहन म्हस्के (३५, रा. ताडीवाला रोड) याला तलवार, कोयता, रॉड, दगडाने मारून निर्घृण खून केला होता. या गुन्ह्यात शिवाजीनगर पोलिसांनी २० आरोपींना अटक केली होती. या टोळीवर मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. मात्र, या गँगचा म्होरक्या पंडित कांबळे हा फरार झाला होता. तो काही केल्या सापडत नव्हता. शिवाजीनगर पोलिस ठाण्यातील तपास पथक ११ मार्च रोजी पेट्रोलिंग करत होते. त्यावेळी पोलिस अंमलदार सचिन जाधव यांना बातमीदाराने बातमी दिली की, खुनाच्या गुन्ह्यातील पंडित कांबळे हा दांडेकर पुल, दत्तवाडी परिसरात येणार आहे. बातमीची खातरजमा केल्यानंतर शिवाजीनगर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक चंद्रशेखर सावंत यांच्या सूचनेनुसार सापळा रचण्यात आला.दांडेकर पूल येथील दीक्षित बागेसमोर तो आला असताना पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. त्यांच्याकडून २ पिस्तुले व ४ जिवंत काडतुसे जप्त केली आहेत. गेल्या १९ महिन्यांपासून तो फरार होता. या फरार कालावधीत त्याने गोवा, कर्नाटक तसेच महाराष्ट्राच्या सीमेवरील गावात राहत असल्याचे सांगितले. मोबाइल वापरत नसल्याने त्याचा सुगावा लागत नव्हता, तसेच एका राज्यातून दुसऱ्या राज्यामध्ये जाऊन वाटसरूंना अडवून त्यांच्याकडून मोबाइल घेऊन नातेवाइकांशी संपर्क करत असे. त्यामुळे पोलिसांची वेळोवेळी दिशाभूल होत होती.ही कामगिरी अपर पोलिस आयुक्त प्रवीणकुमार पाटील, पोलिस उपायुक्त संदीपसिंग गिल, एसीपी साईनाथ ठोंबरे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ निरीक्षक चंद्रशेखर सावंत, पोलिस निरीक्षक (गुन्हे) चंद्रकांत सूर्यवंशी, उपनिरीक्षक अजित बडे, पोलिस हवालदार रुपेश वाघमारे, दिपक चव्हाण, प्रमोद मोहिते, राजकिरण पवार, महावीर चलटे, अतुल साठे, पोलिस अंमलदार सचिन जाधव, प्रवीण दडस, सुदाम तायडे, श्रीकृष्ण सांगवे यांनी केली.पंडित कांबळे हा अट्टल गुन्हेगारपंडित कांबळे हा अट्टल गुन्हेगार असून, अल्पवयीन असल्यापासूनच तो गुन्हे करत आला आहे. त्याच्यावर यापूर्वी २ खुनाचे व इतर ४ गंभीर स्वरूपांचे गुन्हे दाखल आहेत. त्यातील मुंडी मर्डर हा अत्यंत गाजलेला व अतिशय क्रूर पद्धतीने त्याने अल्पवयीन असताना खून केला होता. येरवड्यातील नदीच्या बेटावर खून केल्यानंतर त्याचे मुंडके धडावेगळे करून त्याने मित्राबरोबर मुंडक्याचा फुटबॉल खेळला होता. त्याच्या पंडित टोळी व यल्ल्या टोळी अशा दोन टोळ्या असून, दोन्ही टोळ्यांचा तो प्रमुख आहे. ताडिवाला रोड, बंडगार्डन परिसर, दत्तवाडी, दांडेकर पूल परिसरात त्याची दहशत आहे. 

टॅग्स :PoliceपोलिसMaharashtraमहाराष्ट्रpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडPuneपुणेCrime Newsगुन्हेगारीArrestअटक