Pune Crime | अपहरण झालेला व्यावसायिकच निघाला सराईत गुन्हेगार

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 29, 2022 08:45 IST2022-06-29T08:44:47+5:302022-06-29T08:45:19+5:30

तेलंगणा पोलिसांची कारवाई...

Pune Crime | The abducted businessman turned out to be a notorious criminal | Pune Crime | अपहरण झालेला व्यावसायिकच निघाला सराईत गुन्हेगार

Pune Crime | अपहरण झालेला व्यावसायिकच निघाला सराईत गुन्हेगार

पुणे : पत्नीच्या फिर्यादीवरून पतीच्या अपहरणाचा गुन्हा दाखल करत लोणीकंद पोलिसांनी तपास सुरू केला हाेता. या तपासात अपहरण झालेली व्यक्ती प्रत्यक्षात सराईत गुन्हेगार असून, तेलंगणा पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन नेल्याचे समोर आले आहे. त्या पोलिसांनी संबंधित पोलीस ठाण्याला याची माहिती न दिल्याने हा घोळ झाल्याचे स्पष्ट झाले.

अधिक माहितीनुसार, अपहरण झालेला अनुप सोनवणे हा पूर्वी खडकी येथे राहत होता. काही दिवसांपासून तो लोहगावमधील सावत वस्तीत राहायला आला होता. २६ जून रोजी सायंकाळी सहा वाजता तो फिर्यादीच्या पतीसह कारमधून जात असताना त्याला दुसऱ्या कारमधून आलेल्या लोकांनी आम्ही बंगळुरुचे पोलीस आहाेत. चौकशी करून सोडून देऊ, असे सांगून त्याला घेऊन गेले. एक दिवस वाट पाहून त्याच्या पत्नीचे लोणीकंद पोलिसांकडे तक्रार दिली. हा प्रकार गंभीर वाटल्याने पोलिसांनी तातडीने गुन्हा दाखल करून तपासाला सुरुवात केली.

तेलंगणात अमली पदार्थ तस्करीचा गुन्हा करून अनुप सोनवणे हा पुण्यात वास्तव्याला होता. पोलीस त्याला वाटेत पकडून घेऊन गेले होते. मात्र, बाहेरच्या राज्यात गेल्यानंतर तेथील स्थानिक पोलिसांना माहिती देणे आवश्यक असते. तशी त्यांनी ती दिली नाही. पत्नीला वाटले की पतीचे अपहरण झाले. त्यामुळे तिने खरी माहिती लपवून अपहरण झाल्याची तक्रार दिली होती. मात्र, तपासात खरा प्रकार समोर आला.

Web Title: Pune Crime | The abducted businessman turned out to be a notorious criminal