पुणे : विमाननगर परिसरात विनापरवाना पहाटे ५ वाजेपर्यंत सुरू असलेल्या द नॉयर (रेड जंगल) या पबवर राज्य उत्पादन शुल्क विभागाने धडक कारवाई केली. पबमधून १७८ विदेशी दारूच्या बाटल्या जप्त करण्यात आल्या, तर ५० आरोपींना ताब्यात घेतल्याची माहिती एक्साईज विभागाच्यावतीने देण्यात आली.
परवाना नसताना हॉटेल द नॉयर या पबचा चालक अमरजित सिंग संधू (३०) आणि धर्मेश राज स्वामी (३१, रा. बडोदिया हाऊस, गणेशनगर, वडगाव वेशी) यांनी दारू पिण्यासाठी जागा उपलब्ध करून दिल्याने त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. या ठिकाणी मद्य प्राशन करणारे एकूण ४२ तरुण-तरुणींना ताब्यात घेण्यात आले होते. या कारवाईदरम्यान एक्साईज विभागाने पबमधील मद्य व्यवसाय चालू ठेवण्यासाठी वापरलेले इतर साहित्य खुर्ची, सोफा, लाकडी टी पॉय, लोखंडी स्पिकर, साऊंड लॅपटॉप, एक कॉम्प्युटर, काचेचे ग्लास, फॉग मशीन आदी साहित्य जप्त केले. एकूण ५२ आरोपींवर कारवाई करण्यात आली आहे.
{{{{facebook_video_id####https://www.facebook.com/reel/1648948192972274/}}}}
त्यापैकी दोन आरोपी पब चालक व व्यवस्थापक यांचा शोध सुरू आहे. पबमधून ३ लाख ६७ हजार ३८० रुपयांचा माल जप्त करण्यात आला आहे. यातील दोन आरोपींना न्यायालयात हजर केले असता त्यांना १० जानेवारी २०२६ पर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. याप्रकरणी विमानतळ पोलिस ठाण्यात अवैधरीत्या हुक्का बार चालवून ग्राहकांना तंबाखूजन्य फ्लेवर असलेला हुक्का सेवन करण्यासाठी पुरवत असताना मिळवून आल्याने गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Web Summary : Pune's 'The Noir' pub raided for operating without a license until 5 AM. Authorities seized liquor and arrested 50 people. Two managers are wanted. The total seized goods are worth ₹3,67,380. Two suspects are in custody until January 10, 2026.
Web Summary : पुणे के 'द नॉयर' पब पर सुबह 5 बजे तक बिना लाइसेंस के चलने पर छापा। अधिकारियों ने शराब जब्त की और 50 लोगों को गिरफ्तार किया। दो मैनेजर वांछित हैं। कुल जब्त माल ₹3,67,380 का है। दो संदिग्ध 10 जनवरी, 2026 तक हिरासत में हैं।