पुणे : मैत्रिणीकडे पाहून गाणे गायल्याच्या गैरसमजातून तरुणावर तीक्ष्ण शस्त्राने वार करून खुनाचा प्रयत्न करण्यात आल्याची घटना एनडीए रस्त्यावरील उत्तमनगर भागात घडली. या प्रकरणी उत्तमनगर पोलिसांनी पाच जणांना अटक केली. प्रिन्स शैलेंद्र सिंग (वय २६, रा. भैरवनाथनगर, कोंढवे धावडे) असे जखमी झालेल्याचे नाव आहे.
या प्रकरणी करण गणपत वाशिलकर (वय ३४), राेहित उर्फ ओजी गणेश मौर्य (वय २४), गणेश सिद्धराम कालदीप (वय २०), आदित्य गणेश पवार आणि बबलू शिवाजी कांबळे (वय २२, रा. सर्व रा. उत्तमनगर) यांना अटक झाली. याबाबत सिंग याने उत्तमनगर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. उत्तमनगर भागातील कोंढवा गेट परिसरात प्रिन्स सिंग हा ५ फेब्रुवारी रोजी रात्री दहाच्या सुमारास थांबला होता.
सिंग याने मैत्रिणीकडे पाहून गाणे गायले, असा गैरसमज आरोपी वाशिलकर याचा झाला. वाशिलकर आणि साथीदार मौर्य, कालदीप, पवार, कांबळे यांनी सिंग याला शिवीगाळ केली. तीक्ष्ण शस्त्राने वार केले. पसार झालेल्या आरोपींना पोलिसांनी अटक केली. पोलिस उपनिरीक्षक कुरेवाड तपास करत आहेत.
Web Summary : A Pune youth was attacked due to a misunderstanding over singing at a girl. Five individuals have been arrested for attempted murder in connection to the incident that occurred in Uttamnagar, NDA Road. The victim, Prince Shailendra Singh, is injured. Police are investigating.
Web Summary : पुणे में एक युवती को गाना गाने को लेकर गलतफहमी में एक युवक पर हमला किया गया। एनडीए रोड स्थित उत्तम नगर में हत्या के प्रयास के आरोप में पांच लोगों को गिरफ्तार किया गया है। घायल का नाम प्रिंस शैलेंद्र सिंह है। पुलिस जांच कर रही है।