शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
4
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
5
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
6
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
7
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
8
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
9
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
10
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
11
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
12
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
13
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
14
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
15
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
16
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
17
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
18
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
20
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

पाबळ हादरले..! चारित्र्यावर संशय, सतत वाद; विवाहित महिलेने दोन मुलांसह संपवले जीवन

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 1, 2026 18:56 IST

सकाळी अहिला जाधव आणि त्यांचे पती राजू पांडुरंग जाधव यांच्यात घरगुती वाद झाला होता.

शिक्रापूर  - पाबळ (ता. शिरूर) येथील थोर स्थळ वस्ती परिसरात एक हृदयद्रावक घटना घडली असून, मजुरी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या विवाहित महिलेने आपल्या दोन लहान मुलांसह आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. या घटनेमुळे संपूर्ण पाबळ परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. अहिला उर्फ भाग्यश्री राजू जाधव (वय ३०), मुलगा सार्थक राजू जाधव (वय ५) आणि चार महिन्यांची चिमुकली गौरी राजू जाधव अशी मृत आई व दोन्ही मुलांची नावे आहेत. जाधव कुटुंब मूळचे बीबी, ता. लोणार, जि. बुलढाणा येथील असून सध्या पाबळ येथे वास्तव्यास होते.मिळालेल्या माहितीनुसार, रविवारी सकाळी अहिला जाधव आणि त्यांचे पती राजू पांडुरंग जाधव यांच्यात घरगुती वाद झाला होता. त्यानंतर अहिला या आपल्या दोन मुलांना घेऊन घराबाहेर पडल्या. बराच वेळ होऊनही त्या परत न आल्याने दुपारी पतीने त्यांचा शोध घेण्यास सुरुवात केली.दरम्यान, थोर स्थळ येथील शेतकरी परमेश्वर पिंगळे यांच्या शेतातील विहिरीत चार महिन्यांच्या गौरीचा मृतदेह तरंगताना आढळून आला. ही बाब समजताच परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी मोठी गर्दी केली. पुढील शोधाशोध करताना त्याच विहिरीत अहिला जाधव व पाच वर्षांचा सार्थक यांचेही मृतदेह आढळून आले. घटनेची माहिती मिळताच शिक्रापूर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक सोमनाथ कचरे यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. याप्रकरणी अहिलांच्या बहिणी जयश्री सुनील जाधव यांनी शिक्रापूर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.प्राथमिक तपासात पतीकडून वारंवार चारित्र्यावर संशय घेत भांडणे होत असल्याने मानसिक त्रासाला कंटाळून महिलेने टोकाचे पाऊल उचलल्याचा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. पुढील तपास शिक्रापूर पोलीस करत आहेत.

English
हिंदी सारांश
Web Title : Shikrapur Shaken: Woman Ends Life with Two Children Over Suspicion

Web Summary : A married woman in Pabal, near Shikrapur, tragically ended her life with her two young children by jumping into a well. Ongoing disputes and suspicion about her character from her husband are believed to be the cause. Police are investigating the case.
टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडMaharashtraमहाराष्ट्रCrime Newsगुन्हेगारीPuneपुणेPune Crimeपुणे क्राईम बातम्या