पुणे - निलेश घायवळ टोळीतील चार महिन्यांपासून फरार असलेला आणि दोन मोक्का गुन्ह्यांमध्ये हवा असलेला आरोपी अखेर पोलिसांच्या जाळ्यात अडकला आहे. वारजे पोलिसांनी सोलापूर जिल्ह्यातील बार्शी येथून अमोल दत्तात्रय लाखे (वय २७, रा. ईटखेडा, छत्रपती संभाजीनगर) याला अटक केली. वारजे माळवाडी व कोथरूड पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या मोक्का गुन्ह्यांमध्ये अमोल लाखे फरार होता. त्याच्यावर शाळेच्या पुरवठादार महिलेला धमकावून खंडणी उकळल्याचा गंभीर आरोप आहे. २५ फेब्रुवारी रोजी पोलीस उपनिरीक्षक संजय नरळे यांना माहितीदारांकडून लाखे बार्शीत असल्याची खबर मिळाली. तांत्रिक विश्लेषणाद्वारे खात्री केल्यानंतर पोलिसांनी २६ फेब्रुवारीच्या पहाटे कारवाई करत त्याला ताब्यात घेतले. चौकशीत त्याने गुन्हा केल्याची कबुली दिल्याचे पोलिसांनी सांगितले. ही कारवाई अपर पोलीस आयुक्त राजेश बनसोडे, पोलीस उपायुक्त संभाजी कदम, सहायक पोलीस आयुक्त सुजाता तानवडे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेश बोळकोटगी व पोलीस निरीक्षक प्रकाश धेंडे यांच्या सूचनेनुसार पोलिसांच्या पथकाने ही मोहीम यशस्वी केली. दरम्यान, आरोपीला न्यायालयात हजर करण्यात येणार असून त्याच्याकडून टोळीतील इतर गुन्ह्यांबाबत माहिती मिळण्याची शक्यता आहे. पुणे पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.
Web Summary : Pune police arrested Amol Lakhe, a wanted member of the Nilesh Ghaywal gang, in Barshi. He was involved in extortion and had been on the run for four months. Lakhe faces charges under MCOCA (Maharashtra Control of Organised Crime Act). Further investigation is underway.
Web Summary : पुणे पुलिस ने नीलेश घायवाल गिरोह के वांछित सदस्य अमोल लाखे को बारशी में गिरफ्तार किया। वह वसूली में शामिल था और चार महीने से फरार था। लाखे पर मकोका के तहत आरोप हैं। आगे की जांच चल रही है।