पुणे : परवानगी न घेता रॅली काढून आरडाओरडा करून दहशत पसरवल्याप्रकरणी सराईत गुन्हेगार सुरज ठोंबरेसह १३ जणांच्या टोळक्यावर गुन्हा दाखल झाला आहे. सुरज ठोंबरे, संकेत यादव, ओंकार कुडले, राजन काळभोर, आकाश सासवडे, शुभम पवळे, राहुल कांबळे, नील चव्हाण, शक्ती बनसोडे, दादू तात्याबा पडळकर, नरसिंग भीमा माने, प्रफुल्ल वाघमारे, ओंकार जाधव अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुरज ठोंबरे व त्याच्या टोळीवर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी विरोधी कायदा (मोक्का)नुसार कारवाई करण्यात आली आहे. ठाेंबरे व त्याच्या साथीदारांनी रविवारी सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास कारागृहाबाहेर आल्यानंतर नारायण पेठेतील मुरलीधर हॉटेल ते भिडे पूलदरम्यान विनापरवाना चारचाकी, दुचाकीची रॅली काढून आरडाओरड केला. तसेच शांततेचा भंग करत दहशत पसरवली. या प्रकरणात विश्रामबाग, डेक्कन पोलिसांसह गुन्हे शाखेच्या पथकाने सुरज ठोंबरेसह तिघांना ताब्यात घेऊन त्यांची परिसरातून धिंड काढली.
{{{{facebook_video_id####https://www.facebook.com/reel/1220211596787186/}}}}
ही कारवाई गुन्हे शाखेचे पोलिस उपायुक्त निखिल पिंगळे, खंडणी विरोधी पथकाचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक शैलेश संखे, विश्रामबाग पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक संतोष पांढरे, डेक्कन पोलिस ठाण्याच्या वरिष्ठ पोलिस निरीक्षक गिरीषा निंबाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक राजेश माळेगावे यांच्या पथकाने केली.