शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

विद्युत मोटारीचे केबल चोरी करणाऱ्या ६ आरोपींला ओतुर पोलीसांनी केली अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 14, 2025 10:22 IST

- तब्बल १ लाख १४ हजार १०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

पुणे - ओतूर पोलिसांनी जुन्नर तालुक्यातील शेतकऱ्यांच्या विहिरींमधील विद्युत मोटारीचे केबल चोरी करणाऱ्या सराईत गुन्हेगार टोळीचा पर्दाफाश केला आहे. या प्रकरणात सहा आरोपींना अटक करण्यात आली असून तब्बल १ लाख १४ हजार १०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. ओतूर, रोहोकडी आणि खामुंडी परिसरात शेतकऱ्यांच्या विहिरींमधून विद्युत मोटारीच्या केबल चोरीच्या घटना घडत होत्या. गुन्ह्यांचा तपास करत असताना पोलिसांना एका अटक आरोपीकडून महत्त्वाची माहिती मिळाली. तांत्रिक तपासाच्या मदतीने पोलिसांनी चौकशी केल्यानंतर आरोपींनी विविध भागात केबल चोरी केल्याची कबुली दिली.     दरम्यान, केशव बबन काळे (रा. कुरकुंडी, ता. संगमनेर)  , किशोर सुरेश काळे (रा. भोजदरी, ता. संगमनेर) , राहुल विठ्ठल काळे (रा. भोजदरी, ता. संगमनेर) , दिपक तात्याबा डोके (रा. सावरचोळ, ता. संगमनेर)   हे सर्व आरोपी एकत्र येऊन केबल चोरी करत होते. त्यानंतर चोरी केलेल्या केबल्स जाळून त्यातील धातू सोबरन राजाराम चौहान (रा. घारगाव, ता. संगमनेर, मूळ रा. मध्यप्रदेश) आणि विक्रमसिंग अमरसिंग राठोड (रा. आळेफाटा, मूळ रा. राजस्थान) या भंगार व्यापाऱ्यांना विकले जात होते.  केशव काळे आणि किशोर काळे हे सराईत गुन्हेगार असून त्यांच्यावर यापूर्वीही पुणे आणि अहमदनगर जिल्ह्यात विविध पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत. पोलीस अधीक्षक पंकज देशमुख, अपर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे, उपविभागीय पोलीस अधिकारी  रवींद्र चौधर यांच्या मार्गदर्शनाखाली ओतूर पोलिसांनी ही कारवाई केली. तपास पोलीस हवालदार बाळशीराम भवारी  आणि नदीम तडवी करत आहेत.  सर्व आरोपींना जुन्नर न्यायालयासमोर हजर करण्यात आले असून ते सध्या पोलीस कोठडीत आहेत. या कारवाईमुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. ओतूर पोलिसांनी घेतलेली जलद कारवाई आणि गुन्हेगारांना अटक केल्याने स्थानिक नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.

टॅग्स :PuneपुणेMaharashtraमहाराष्ट्रpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडPoliceपोलिसPune Crimeपुणे क्राईम बातम्या