शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
5
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
6
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
7
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
8
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
9
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
10
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
11
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
12
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
13
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
14
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
15
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
16
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
17
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
18
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
19
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
20
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

'..नाहीतर,हात-पाय उडतील';औंधमधील नामांकित शाळेला बॉम्ब ठेवल्याची धमकी

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 1, 2025 12:16 IST

हा धमकीचा मेल ‘roadkillkyo’ नावाच्या ईमेल आयडीवरून पाठवण्यात आला असून, तो कोणी पाठवला, यामागे नेमके कोणते नेटवर्क कार्यरत आहे, याचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी सायबर विभागाच्या मदतीने तपास सुरू केला आहे.

पुणे (औंध) : पुण्यातील चतु:श्रृंगी पोलिस ठाण्याच्या परिसरात सिटी इंटरनॅशनल स्कूल, औंध या नामांकित शाळेच्या ईमेलवर धक्कादायक धमकीचा मेल प्राप्त झाला. या मेलमध्ये, शाळेच्या परिसरात शक्तिशाली स्फोटके ठेवली असून इमारत तातडीने रिकामी न केल्यास आत असलेल्या लोकांचे मृत्यू होणार, लोकांना बाहेर काढा नाहीतर, हात-पाय उडतील.

आम्ही 'रोडकिल' आणि 'क्यो' या दहशतवादी संघटनेचे सदस्य आहोत. हा मेसेज मीडिया हाऊसना द्या असा धक्कादायक मजकूर होता. हा मेल ३० जून २०२५ रोजीला सकाळी ११.५० वाजता आला असल्याची माहिती समोर येत आहे.  दरम्यान, या मेलची माहिती मिळताच शाळेच्या प्राचार्या अपूर्वा पाटील यांनी जबाबदारीने तात्काळ चतु:श्रृंगी पोलिस ठाण्याच्या लँडलाईनवर संपर्क साधून घटनेची माहिती दिली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक उल्हास कदम यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांचे पथक, तसेच अँटी टेररिस्ट सेल (ATC) व गुप्त विभागाचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. त्यासोबतच बॉम्ब शोध व निकामी करणारे पथक (BDDS) देखील पाचारण करण्यात आले. बीडीडीएस अधिकारी डिओ सातपुते यांच्या नेतृत्वाखाली पथकाने शाळेच्या संपूर्ण इमारतीची कसून तपासणी केली.या तपासणीनंतर बीडीडीएस पथकाने लेखी प्रमाणपत्र देऊन शाळा परिसरात कोणतीही स्फोटके किंवा संशयास्पद वस्तू आढळली नसल्याचे स्पष्ट केले. या कारवाईदरम्यान पोलिसांकडून दोन अधिकारी आणि १२ अंमलदारांचा बंदोबस्त शाळेसमोर ठेवण्यात आला होता. या घटनेच्या पार्श्वभूमीवर चतु:श्रृंगी पोलिसांनी हद्दीतील डीएव्ही पब्लिक स्कूल, औंध आणि लॉयला स्कूल, पाषाण रोड या शाळांना भेट देऊन प्राचार्यांना अतिरिक्त सतर्कतेच्या सूचना दिल्या. हा धमकीचा मेल ‘roadkillkyo’ नावाच्या ईमेल आयडीवरून पाठवण्यात आला असून, तो कोणी पाठवला, यामागे नेमके कोणते नेटवर्क कार्यरत आहे, याचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी सायबर विभागाच्या मदतीने तपास सुरू केला आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील कायदेशीर पावले उचलली जात आहेत. या घटनेमुळे शाळा परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले असले तरी, शाळा प्रशासनाने दाखवलेली दक्षता आणि पोलिसांची तत्पर कारवाई यामुळे कोणताही अनुचित प्रकार घडला नाही.

टॅग्स :PuneपुणेCrime Newsगुन्हेगारीTerror Attackदहशतवादी हल्लाMaharashtraमहाराष्ट्रpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड